Ticker

6/recent/ticker-posts

पाथरी (रुंजा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना

 


गावकऱ्यात रोष, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

News Today

मंगेश गोरे

वणी :- येथून जवळच असलेल्या केलापूर तालुक्यातील पथती येथे डॉ बाबासाहेब आंबेडकऱ्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

यवतमाळ मार्गवरील उमरी वरून अवघ्या ४ किती अंतरावर असलेल्या पाथरी येथे काल ता. २१ रोजयाच्या रात्रीला अज्ञात समाज कंठकाकडून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबन करण्यात आल्याने गावकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष  निर्माण झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घ्यावा - दिलीप भोयर

या घटनेतील जो कोणी समाज कंठक आरोपी असेल त्याचा तात्काळ शोध पोलिसांनी घ्यावा व त्याचे सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केली आहे.