Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! 20 महिलांवर अधिकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार; अंगणवाडीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं

 

News Today

दिलीप भोयर

सिरोही (राजस्थान):-  अंगणवाडीमध्ये नोकरी देतो असं आमिष दाखवून 20 महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजस्थानच्या सिरोहीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या सर्व महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याच्या नावाखाली बोलावून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडीओही तयार करण्यात आला. सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष व माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी ही क्रूर घटना घडवून आणली.

गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी अध्यक्ष महेंद्र मेवाडा, आयुक्त महेंद्र चौधरी आदींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि माजी आयुक्त तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवून आणली. नोकरीचे आमिष दाखवून या नराधमांनी महिलांना आपल्या जाळ्यात फसवले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिरोहीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


जेवणात अंमली पदार्थ मिसळले

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सिरोही कोतवाली पोलीस ठाण्यात नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि तत्कालीन आयुक्तांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच हे प्रकरण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

खरं तर पीडित महिलांच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळल्याचे सांगण्यात येत आहे. नोकरीच्या नावाखाली जेवणात पदार्थ मिसळून सामूहिक बलात्कार करून सर्व महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आल्याचे एका महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिलेने सांगितले की, दोन-तीन महिन्यांपूर्वी ती अंगणवाडीत काम मिळावे यासाठी 15-20 महिलांसोबत सिरोही येथे गेली होती. नगरपरिषदेचे सभापती महेंद्र मेवाडा व तत्कालीन आयुक्त महेंद्र चौधरी यांची तेथे बैठक झाली. मग त्यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी राहायला लावले आणि तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था केली.राजस्थान मधील धक्कादायक घटना

महेंद्र मेवाडा आणि महेंद्र चौधरी या दोघांनी आपल्या इतर मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत षड्यंत्र रचून नोकरीच्या शोधात आलेल्या महिलांच्या जेवणात अमली पदार्थ मिसळले होते, त्यामुळे त्या सर्व महिला बेशुद्ध झाल्या होत्या. यानंतर दोघांनी आपल्या मित्रांसह सर्व सहकारी महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले, असेही तक्रारदार महिलेनं सांगितलं. 

तिने आणखी सांगितले की, जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा सर्वांनाच डोकेदुखी होत होती. मग आम्ही याबाबत महेंद्र चौधरी आणि महेंद्र मेवाडाला विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही सर्वांनी मिळून मजा केली आहे. दोघांनीही आम्ही तुम्हा सर्वांना फसवून इथे मौजमजा करण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. त्या दोघांसोबत अजून 10-15 मित्र होते, ते सगळे जोरजोरात हसत होते. त्यावेळी हे सर्वजण दारूच्या नशेत होते.

तसेच तेथे अनेक दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. महेंद्र मेवाडा आणि महेंद्र चौधरी यांनी त्यांच्या 10-15 मित्रांसह त्या सर्व महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत गलिच्छ काम केले. पीडित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे, असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे.