Ticker

6/recent/ticker-posts

हे आचार संहितेचे उलंघन नव्हे का? मतदरांना पडलेला प्रश्न

 

News Today

 प्रतिनिधी

वणी येथील वडगाव मार्गावरील देशमुखवाडीतील नाना नानी पार्क जवळ एका घराच्या सुरक्षा भिंतीवर मोठ्या अक्षरात भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करीत असलेले चित्र रखटले आहे. या चित्रापासून आचार संहितेचे उलंघन होत नाही का असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. मागील चार पाच दिवसापूर्वी तिथी नुसार संपन्न झालेल्या मनसेच्या शिवजयंती देखाव्याला पक्षाचे झेंडे लावले असता आचार संहितेचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात असल्याची माहिती आहे. या निवडणुकीत भाजपला निवडणूक आयोगाने प्रचारासाठी मोकळीक दिली आहे का ? नसेल तर मग निवडणूक आयोग आपले डोळे का झाकून आहे.



सार्वत्रिक लोसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून दिनांक १६ मार्च पासून आचार संहिता लागू झाल्या आहेत. चंद्रपूर अर्णी मतदार संघाची १९ एप्रिल रोजी मतदान संपन्न होणार आहे. विविध पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून नामांकन देखील दाखल करून उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या वाढल्या आहे. तसेच निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आचार संहिता लागू असून यात कोणत्याही प्रकारे बिना परवानगीने राजकीय पक्षाचा व त्यांच्या प्रचार चिन्हाचा प्रचार व प्रसार करणे एक गुन्हा आहे. असे गुन्हे घडू नये यासाठी आचार संहितेचे तंतोतंत पालन व्हावे याकरिता विविध पथक देखील कार्यरत आहे. परंतु निवडणूक आयोग व निवडणूक आयोगाच्या पथकाला जर वरील भिंतीवरील चित्र व त्यावर लिहलेले स्लोगन जर दिसत नसेल तर आचार संहितेचे केवळ विरोधी पक्षानेच पालन करायचे का व सत्ता धाऱ्यांना त्यातून सुट दिली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.