Ticker

6/recent/ticker-posts

ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निकट वर्तीय एका नेत्याच्या साळ्याला दारू वाहतूक प्रकरणी अटक

 

         दारूवर ज्ञान पेलणारेच निघाले दारू तस्कर

News Today 

प्रतिनिधी

चंद्रपूर :-  भारतीय जनता पार्टी ( महायुती )लोकसभेचे उमेदवार राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तिय असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या साळू आशिष सुरेश मोरे रा. तोहगाव यांना कोठारी पोलिसांनी दारूची वाहतूक करताना वाहनासह अटक करून ताब्यात घेवून  सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण लोकसभा मतदार संघात चर्चेचा विषय बनला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी घडली असल्याची माहिती आहे. या कारवाईत मात्र पोलिसांचे प्रचंड कौतुक केल्या जात आहे.



कोठारी ते गोंडपिपरी मार्गावर एका वाहनातून दारूची वाहतूक केल्या जात असल्याची माहिती पोलिसांच्या फिरत्या पथकाला मिळाली असता त्या पथकाने संशयीत बोलेरो वाहन अडवले असता त्या वाहणात मिळालेल्या सूचनेवरून विलायती दारू मिळून आली. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना भूलविण्यासाठी ही दारूची तस्करी केल्या जास्त असल्याची जोरदार चर्चा रंगली असून दारू विषयी ज्ञान सांगणारे सुधीर मुनगंटीवार व त्यांचे खंदे समर्थक देवराव भोंगळे यांचे साळेच दारू तस्करीच्या आरोपाखाली अटक झाल्याने मतदारांमध्ये आणखी नाराजी पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केल्यास अशी दारू कुठ कुठ पोहचतो केली व कोणाच्या सांग्यावरून केली याचे पितळ उघड पडणार आहे. परंतु पोलिसांवर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा आहे. योग्य चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जोर पकडत आहे.


राजुरा विधानसभेची जबाबदारी देवराव भोंगळे यांचेकडे

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील प्रचाराची व मतदार संपर्काची जबाबदारी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचेवर देण्यात आल्याची माहिती आहे. या मतदार क्षेत्रात wcl असल्याने कामगार वर्ग भरपूर आहे. कामगारांना दारूचा पुरवठा केला तरच मतदान मिळतील अशी अस बोलल्या जात आहे. त्याकरिता कदाचित भोंगळे यांचा साळा ही दारू पोहचविता असल्याची चर्चा आहे. विकास पुरुषाच्या प्रचाराला दारूची गरज आहे का? असेल तर एकेकाळी दारू बंदीची घोषणा करणारेच दारू तस्करी करायला लागल्याने मतदार प्रचंड रोष वाढला आहे. 


बघा व्हिडिओ