Ticker

6/recent/ticker-posts

सुधीर मुनगंटीवार यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याने गावागावात पसरली विरोधाची लाट

 

भाजपच्या प्रचार वाहणार मारल्या जात आहे घाण 

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदारांचा प्रखर विरोध

News Today

प्रतिनिधी

वणी :-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सभेत हजारो मतदारांच्या समक्ष बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारे विवादित वक्तव्य केली केल्याने संपूर्ण राज्यात महिला शक्ती कडून तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. तेवढंच नाही तर सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचार रथावर देखील संतप्त गावकऱ्यांकडून घाण मारून प्रखर विरोध नोंदविण्यात येत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीची रणशिंग फुंकले असून यात सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कामी लागले आहे.  यात भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथील मोरवा येथील धावपट्टी जवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ता. ८ एप्रिल रोजी प्रचार सभा घेण्यात आली होती या सभेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा लोकसभा क्षेत्राची सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनोगतात काँग्रेस पक्षावर टीका करीत असताना एका सांस्कृतिक मंत्र्याला न शोभानाऱ्या भाषेत एका बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे वक्तव्य केल्याने मतदारांमध्ये  रोष निर्माण झाला आहे. याच्या परिणाम चंद्रपूर मतदार क्षेत्रातील खेड्यापाड्यात मतदारांमध्ये प्रखर रोष दिसून येत असल्याने मुनगंटीवारांच्या प्रचार रथ गावात जाताच अनेक त्यांचा रथ माघारी पाठवत आहे तर काही ठिकाणी रथावर घाण, माती, शेन मारून मतदार आपला रोष व्यक्त करीत आहे. असच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील खिर्डी गावात घडल्याची माहिती आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या एका बेताल वक्त्यावणे मतदारांमध्ये रोष वाढला असला तरी एका सांस्कृतिक मंत्र्याला न शोभणारे वक्तव्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अपमान करणारे आहे. हीच का महाराष्ट्राची संस्कृती अशी प्रतिक्रिया उमटल्या जात आहे. यामुळे भाजपचे देवून पाण्यात देवून येत आहे. या बाबत भाजप कडून सरवा सारवाची  उत्तरे दिल्या जात आल्या तरी रोष मात्र प्रखर वाढत आहे. राज्यातील अनेक पोलिस स्टेशन मध्ये महिलांनी तक्रारी नोंदविला जात आहे. 

संतप्त नागरिकांकडून प्रचार रथावर घाण मारताना मतदार व नागरिक बघा व्हिडिओ.