Ticker

6/recent/ticker-posts

वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटला - एक ठार एक जखमी

 

                                 संग्रहित चित्र

प्रतिनिधी

वणी :- येथील अहेरी बोरगाव नदी घाटावर आज सकाळी वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आज तारीख ७ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाळू वाहतूक करतांना पटल्याने एका मजुराचा जागीच जीव गेला तर एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही वाळू रॉयल्टी भरलेली होती की चोरीची होती याचा तपास करण्याची गरज आहे. मृत्य झालेल्या मजुराला उत्तरीय चाचणीसाठी वणी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमीवर उपचार सुरू आहे. अशी माहिती मिळाली आहे. 

   याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार अद्याप पर्यंत दाखल नसल्याने प्रकरण आपसी निपटारा करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. मृतकाचे नाव रवी मेश्राम वय २८ रा. वागदारा तर जखमीचे नाव विशाल नैताम वय ३५ रा. विराणी टॉकीज वणी असे असल्याची माहिती आहे.