Ticker

6/recent/ticker-posts

दुर्घटना, प्रचाराच हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…


 News Today

प्रतिनिधी 

महाड :- सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांची प्रचारसभेसाठी धावपळ सुरु आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुषमा अंधारे यांच्या या  अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर महाड मध्ये क्रश झालं आल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटना प्रकरणी सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलेट दोघेही सुरक्षित आहेत. कारण अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे.

मात्र महाडमध्ये झालेली ही घटना अत्यंत खळबळजनक आहे. महाडमध्ये क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुषमा अंधारे या इतर वेळी त्यांच्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी या घटनेमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.