वणी येथील नायब तहसीलदार सापडले गोत्यात
घोंसा येथील विलास डाहुले यांचा आरोप
WaniToday
दिलीप भोयर
वणी :- तालुक्यातील घोंसा नदी घाटावरून रेती ( वाळू ) तस्करी करीत असलेला तलांडे नामक व्यक्तीचा ट्रॅक्टर रात्री २.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कापशिकर यांनी ७० हजार रुपये घेवून सोडल्याचा घणाघाती आरोप विलास डाहुले यांनी ऑन कॅमेरा दिल्याने संपूर्ण महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली असल्याने नायब तहसीलदार चांगलेच गोत्यात सापडण्याची शक्यता वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रेती (वाळू) तस्करांच्या माघारीवर असलेले वणी येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले महसूल नायब तहसीलदार कपाशिकर यांनी घोंसा घाटावरून एक ट्रॅक्टर रेतीची (वाळू) तस्करी करीत असल्याच्या माहितीवरून रेती तस्करी करीत असलेला ट्रॅक्टर रेती (वाळू ) नदी पात्रातून रेती (वाळू) बेकायदेशीरपणे वीणा रॉयल्टीने भरत असल्याचे आढळून आला असता त्याला रंगेहाथ पकडण्यात आला. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न करता संबंधित ट्रॅक्टर धरकांकडून ७० हजार रुपये परस्पर घेवून ट्रॅक्टर सोडला असल्याचे आरोप विलास डाहुले यांनी केल्याने महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. या विषयी सत्यता पडताळनीची गरज वरिष्ठांना निर्माण झाली आहे.
रेती तस्करी करीत असलेल्या ट्रॅक्टरवर नायब तहसीलदार यांनी रीतसर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती पण त्यांनी शासनाचा दंड बुडवून स्व हितासाठी आर्थिक लाभ मिळवून कायद्याला बगल देत कर्तव्य कसूर केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याबाबत चौकशी करून काय कारवाई करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. याबाबत वरिष्ठांना संपर्क साधला असता कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला आहे.
वणी परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज तस्करी सुरू असून वाळू ही सर्वाधिक तस्करी केल्या जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व तस्करी रोकण्यासाठी महसूल व पोलिस विभागाला कारवाई करण्याचे अधिकार सरकारने बहाल केले आहे. परंतु अधिकारी वर्ग या अधिकाराचा वापर स्वतःच्या लाभ मिळण्यासाठी घेत असल्याचे आरोप आता चक्क रेती तस्करच उघडपणे करीत असल्याने या अधिकाऱ्यांचा कर्तव्यदक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणाची उचित चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई करण्याची मागणी जनतेतून केल्या जात आहे.
आरोपकर्त्याकडूनही रेती तस्करी करीत असल्याची कबुली व देवेंद्र फडणवीसांनी खुलासा देण्याची मागणी नी
दस्तुर खुद आरोप कर्ते विलास डाहूले यांनी नायब तहसीलदार कापसे यांनी आर्थिक लोभाला बळी पडून ७० हजार घेत रेती तस्करीचा ट्रॅक्टर सोडल्याचा आरोप केला असला तरी कापसे नामक कोणीही नायब तहसीलदार नाही परंतु त्यांनी ते नाव घेताना का म्हणण्या ऐवजी कापसे असे संबोधिले आहे. तरी ते कापाशिकर हेच असंल्याचे सांगत आम्ही देखील रेती तस्करी करतो आहे याची ही कबुली दिली आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या बाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. अधिकारी वर्ग एकाला एक आणि दुसऱ्याला एक नियम लावून हिताच्या लोकांकडून तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप आता उमटायला लागले.
बघा व्हिडिओ ...
संबंधित व्हिडिओची संपादक/प्रकाशक सत्यता पडताळणी करीत नाही.