अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट धोरणाची प्रचिती
वणी :- येथील मुख्य मार्गावर २४ कोटी रुपये खर्च करून पाण्याच्या नियोजन मात्र शून्यतेमुळे खुल्या जागेवर पाणी साचून राहिले आहे.
वणी शहरातील मुख्य मार्गावर मोठ्या थाटामाटात काँक्रिट रस्ता बांधण्यात आला आहे. हा रस्ता बांधण्यात येत असताना मूळ रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच करून बांधण्यात आला आहे. रस्ता बांधकाम करतेवेळी पावसाचे पाणी नालीत जावून दे त्या पाण्याची विल्हेवाट लागणे गरजेचे आहे.परंतु रस्ता बांधकाम करणारी यंत्रणा केवळ कमिशन कोणत्या पद्धतीने खाता येईल असेच धोरण राबवून रस्ता बांधकाम करून जनतेला समस्येच्या खाईत घालत आहे. असे दिसून येत आहे.
सतेतील लोकप्रतीनिधी हे मटक्याच्या अड्यावर पोलिस बनून धाड मारतो, तहसील कार्यालयातील काम करणाऱ्या बेरोजगारांना बाहेर काढतो परंतु करोडो रुपये खर्ची घातलेल्या रस्त्याची स्थिती मात्र ढुंकूनही बघत आहे. कदाचित कमिशन खोरीत यांचेही हात अडकले असावे असा आरोप केल्या जात आहे.
पावसाचे पडलेल्या पाण्याचे नियोजन नसल्याने हे पाणी शासकीय कार्यालये व खासगी घरांमध्ये अश्या पद्धतीने शिरत आहे. त्यामुळे विकासाला गती की विकासाची माती असा प्रश्न निर्माण झाला आहे.