रस्त्याने धारण केले शेततळ्याचे रूप
दिलीप भोयर
Wanitoday
वणी :- तालुक्यातील पुरड - मोहदा - वेळाबाई मार्गावर हा पुर्णतः बेपत्ता झाला असून रस्त्याची स्थिती शेततळे निर्माण झाल्या सारखी झाली आहे. त्यामुळे सत्तेतील भारतीय जनता पार्टीच्या प्रगतीचा ओवापोवा पाहून गॅरंटीचा विकास रस्ता बघताच पागल झाला आहे.
राज्य मार्ग क्रमांक ३१५ हा वेळाबाई ,मोहादा, कृष्णानपुर, कुंड्रा, पुरड मार्गे मु मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असते. या भागातील शेतकऱ्यांना बाजारासाठी शेती साहित्य खरेदी व विक्री करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी मुकुटबन किंव्हा कायर मार्गे वणीला जावं लागत आहे. तसेच मूकुटबन परिसरातील नागरिकांना चंद्रपूर - कोरपना जाण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. परंतु या मार्गाची मागील १० वर्षापासून प्रचंड दुर्दशा झाली आहे. मागील दहा वर्षात या मार्गावर करोडो रुपये खर्ची घातले आहे. परंतु कंत्राटदाराच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाने मार्ग दरवर्षी उद्ध्वस्त झाला आहे. या कामातील करोडोच्या रकमेतील लाखो रुपयांचे चिरिरी अधिकारी व लोकप्रतिनिधी हळप करून जनतेला मरण यातना दिल्या आहे. अनेकांचे अपघात होऊन सुखी संसाराचा गाडा ओढणारे कुटुंब प्रमुख मृत्युमुखी पडल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याचे कोणतेही सोसर सुतक मात्र निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना दिसून येत नाही. त्यामुळे जनमानसात भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध प्रचंड रोष निर्माण होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे सत्तेतील लोकप्रतिनिधी व त्यांचे भूरके पुढारी मात्र सातत्याने विकास झाला , विकास झाला म्हणून ओरड करीत सतत त्यांनी या मार्गाने मार्ग भ्रमण करून दाखवण्याचे आवाहन या परिसरातील नागरिकांनी केले आहे. त्यामुळे भाजपने रस्त्याचा विकास केला की स्वतःचा विकास केला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर मार्गावरील रस्त्याचं बेपत्ता झाला असून मार्गात मोठ मोठ खड्डे पडले आहे. त्यात पावसाचे पाणी साचले असल्याने ते चक्क शेततळ्याचे रूप धारण करीत आहे. हे शेततळे बघून भाजपच्या गॅरंटीचा विकास मात्र पुर्तंत: पागल झाला आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पागल झालेल्या विकासचा उपचार जनता मतदानातून करणार असल्याची चर्चा मात्र जोर पकडत आहे.
बघा रस्त्याचा विकासाचा व्हिडिओ...