Ticker

6/recent/ticker-posts

वरोरा तालुक्यातील गावोगावी होत आहे ग्रामगीतेच्या विचारांचा जागर

 

नरेंद्रदादा जीवतोड यांच्या पुढाकारातून प्रबोधनाची वारी,  फिरत आहे संत विचारांची घेवोनी शिदोरी

News Today 

प्रतिनिधी

वरोरा :- येथून जवळच असलेल्या वरोरा तालुक्यातील गावागावात जावून "प्रबोधनाची वारी " वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता विचारांचा जागर करीत असल्याने गावातील नागरिकांमध्ये चैत्यानाचे वातावरण निर्माण होत आहे. ही वारी वरोरा तालुक्यातील नंदोरी येथील स्थित नरेंद्रदादा जीवतोड यांच्या पुढाकारातून फिरत असल्याने संत विचारांच्या शिडोरीचा प्रसाद  देखील गावागतील भाविक भक्तांना मिळत असल्याने संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.



वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्या राष्ट्रभक्ती, वेसण मुक्ती, हुंडाबळी, ग्राम उन्नती अश्या पवित्र विचारणा घेवून संपूर्ण विदर्भात गुरुकुल आश्रम मोझरी येथून तारीख ११ ऑगस्ट रोजी उद्घाटन होईल निघालेली ही प्रबोधनाची वारी सर्व प्रथम भद्रावती तालुक्यातील संपूर्ण गावागावात जावून श्रीगुरुदेव सेवा मंडळांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून ग्राम विकासासाठी विविध योजनेची माहिती देवून शेतकरी ,शेतमजूर व सर्व नागरिकांना जागृत करीत आहे.  दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत या  प्रबोधनाच्या वारीने सोळाव्या दिवशी वरोरा व भद्रावती तालुक्यातील १३५ गावांना भेट दिली आहे. यावरीमुळे ग्रामस्थांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत आहे. या वारीसाठी अध्यात्म गुरुकुलचे संचालक रविदादा मानव, सप्तखंजिरी वादक इंजि. भाऊ थुटे, उदयपाल महाराज, युवा प्रबोधनकार राज घुमणार, आकाश ताविडे, प्रज्वल टाँगे आदी परिश्रम घेत असून नरेंद्रदादा जीवतोड यांच्या पुढारातून वारीचा सोहळा वरोरा - भद्रावती तालुक्यातील तमाम गावकऱ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.