वाचा मुंबईत व दिल्लीत किती कोटीची फ्लॅट
दिलीप भोयर
वणी :- सत्तेचा मोह चढला की त्यांच्या मालमत्तेतही प्रचंड वाढ होते आहे. येथील एका लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलीच्या नावाने मुंबईत तर जावयाच्या नावाने दिल्लीत करोडो रुपयाचे फ्लॅट घेतल्याची जोरदार चर्चा वणी विधानसभेत गाजत आहे. हे फ्लॅट किती करोडचे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.
ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणाऱ्या राजकीय पक्षातील एका पुढाऱ्यांचे वाक्य सर्वांना माहीत आहे. यांच्या राजकीय पक्षातील एका लोकप्रतिनिधीनी राजकीय सत्तेचा वापर करून जनतेच्या तिजोरीतील हजारो कोटी रुपयाचा डल्ला मारला आहे. कर्जबाजारीपणा दाखवणारा हा लोकप्रतिनिधी फक्त दाखविण्यापुरता गोड बोलून गळे कपात असल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. राजकारणाला व्यवसायिकांचा जोड लावून सत्तेचा व्यापार केला जात आहे. या व्यापारातून जनतेच हीत बाजूला सारून स्वहीतचे व कुटुंबाचे हीत जोपासल्या जात असेल तर हा एकप्रकारे देश द्रोहाचा गुन्हाच म्हणावा लागेल परंतु जनतेच्या डोळ्यावर धर्माचा व जातीचा चष्मा जो पर्यंत लागला आहे. तो पर्यंत हे लोकप्रतिनिधी जनतेचे फक्त शोषण करणारच आहे. असो परंतु सर्वांना उत्सुकता असेल की नेमका मुलीच्या नावाने व जावयाच्या नावाने किती करोडची संपत्ती गोळा केली आहे हे जाणून घेण्याची उत्कर्शा शिगेला गेली आहे. यात खाजपाचे "भ्रष्ट"क्रूर"वार" या राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या मुलीच्या नावाने मुंबईत जवळपास ७ कोटी रुपयाचा फ्लॅट तर दिल्लीत ५ कोटी रुपयाचा फ्लॅट घेतला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या फ्लॅटची मूळ किंमत जास्त असू शकते पण खरेदी मात्र सरकारी मूल्यांकन करून घेतले आहे. त्यामुळे सरकारी महसूल देखील या लोकप्रतिनिधींनी बुडवाला आहे. तेवढा मोठा पैसा शेवटी आला तरी कुठून असा प्रश्न. जरी सर्वांना पडला असला तरी या लोकप्रतिनिधीला याची जागा दाखविण्याची जोरदार तयारी मतदारांनी केली आहे. या भ्रष्ट लोकप्रतिनिधीमुळे सत्तेतील या खाजप जनता पार्टीची प्रतिमा चांगलीच मल्लीन होत आहे.
सरकरलाकडे मोदी आवास योजनेला निधी नाही
जनतेच्या भारोष्यावर सत्तेत गेलेल्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या दिमाखात इतर मागास वर्गीय लोकांना मोदी आवास योजना अंमलनात आणली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालं म्हणून ते घर पाडून नवीन घर बांधणीला सुरवात केली आहे. परंतु निधी अभावी वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारत आहे. पावसाच्या दिवसात जनावरांच्या गोठ्यात दिवस काढत आहे. जिवंतपणे यातना भोगत आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाडक्या जावयासाठी दिल्लीत करोडोचा फ्लॅट घेत आहे. त्यामुळे जनतेत मोठा रोष व्यक्त केल्या जात आहे.
वरील बातमी मनोरंजनासाठी लिहिलं आहे. यात कुणाचा संबंध जुडल्यास तो योगायोग समजावा संपादक
पुढच्या बातमीत शासकीय कंत्राटदार आर. व्ही. उंबरकर कंत्रक्षण कंपनीचे मालक व विधासभेतील लोकप्रतिनिधीं यांच्या संयुक्त भूखंडाचे खरेदी विक्रीचे पुरावे.