Ticker

6/recent/ticker-posts

दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या वतीने जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळावा

 

जिल्हा प्रतिनिधी 

गोपीचंद पुरी

News Today 

वर्धा:-  दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या वतीने जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन  श्रीक्षेत्र शेगांव येथील  रोजी दुपारी १२ वाजता  प्राचीन हनुमान मंदिर गांधी चौक येथे शुक्रवार ३० ऑगस्ट दुपारी १२ वाजता आयोजत केला आहे.

 या कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प. दास गिरी महाराज कृष्णाई गौरक्षण संस्थान संस्था आंबोडा ता. अकोट जि.अकोला प्रामुख्याने सत्कारमुर्ती संत नगरी  श्रीक्षेत्र  शेगाव येथे दशनाम गोसावी  समाजाला दफनभूमी साठी एक एकर जागा मिळाली आहे मदत करणारे माजी मंत्री आमदार संजयभाऊ कुटे व माजी नगराध्यक्ष शरदशेठ अग्रवाल, पुरूषोत्तम शेगोकर तसेच समाज भूषण अधिकारी ब्रह्मगिरी पोलीस निरीक्षक, दिलीप भारती पोलीस उपनिरीक्षक व सहदेव पुरी  पशुधन पर्यवेक्षक  यांचाही याप्रसंगी  सत्कार करण्यात येणार आहे  अध्यक्षस्थानी चंद्रकांत गिरी यांचे मार्गदर्शन होईल गोसावी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.