Ticker

6/recent/ticker-posts

सां. बा. विभागाची अतिक्रमणाच्या नावाखाली असुरी कारवाई

 


२४ कोटी रुपयाचा बोगस रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराला अभ्यय आणि छोट्या व्यावसायिकांवर मारला हातोडा

News Today 

दिलीप भोयर

वणी :- रस्ता लगत रोज मजूरी करून आपले व आपल्या कुटुंबाचा उधार निर्वाह करण्यार्या व्यावसायिकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला आहे. 

एकीकडे २४ कोटी रुपयाचा काँक्रिट रस्ता बोगस पद्धतीने बनविला असून त्यावर कोणतीही कारवाई नाही तर दुसरीकडे गोरगरिबांच्या व्यवसायावर कारवाईचा हातोडा मारण्यात येत असून सत्तेतील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का ? असा सवाल निर्माण झाला आहे. 

   शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या नालीवर फळ विक्रेते, भाजी विक्रते, बॅग, कपडा व इतर छोटे व्यावसायिक दररोज आपला व्यवसाय करून उधार निर्वाह करीत आहे. शेकडो नागरिक बेरोजगारीवर मात करून उद्योग व्यवसाय करीत आहे. एकीकडे बेरोजगारी सुशिक्षित बेरोजगार वन वन फिरत आहे. तर दुसरीकडे उभे झालेले स्वयंम रोजगार शासनातील अधिकारी व शासन उद्ध्वस्त करीत आहे. 

     छोट्याश्या व्यवसायावर उभी असलेली त्यांची जिंदगी पुर्णतः बरबाद करण्याचा घाट का रचल्या जात आहे व कोणासाठी रचल्या जात आहे. असा सवाल निर्माण झाला असून या कारवाईला असुरी कारवाई म्हणून संबोधील्या जात आहे. 

२४ कोटीचे रस्ता बांधकाम फसवेगिरीचे असताना कारवाई नाही

चिखलगाव चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतचे रस्ता कोंक्रेटी करणाचे काम जे. पी. कंट्रत्रक्षण कंपनीला दिले असताना वणी येथील आर. व्ही. उंबरकर कंट्रक्षण कंपनी कडून करून घेतले व ज्या पद्धतीने आर.एम.सी. प्लांट पाहिजे होते ते न उभरता व पेव्हर मशीनचा वापर न करता म्यानपॉवरनी करून सर्व काम बोगस केले आहे. याबाबत अनेक त्रकरी करून देखील सां. बा. विभागाने कारवाई केली नाही. आणि आज असुरी कारवाई करून गोर गरिबांचे उद्योग उद्ध्वस्त करून त्यांना उपाशी मारण्याचा घाट रचल्या जात आहे. आणि या भागातील लोकप्रतिनिधी मात्र मुंग गिळून गप्प आहे.