News Today
वणी :- शहरातील जनमत न्यूज पोर्टलचे प्रबंध संपादक तथा दै.सायरन पेपरचे शहर प्रतिनिधी महेश टिपले यांची युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी नियुक्ती केली.
यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, विदर्भ अध्यक्ष विजय सुर्यवंशी, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण टेकाडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, जिल्हा सचिव धनंजय वानखडे, जिल्हा संघटक पुरूषोत्तम कडवे, राळेगाव तालुका अध्यक्ष खुशाल वानखडे,वणी तालुका अध्यक्ष महेश टिपले, उमेश अवघड नेर तालुकाध्यक्ष इत्यादींची निवड करण्यात आली.