Ticker

6/recent/ticker-posts

शहरालगत उभारे काळ्या कोळशाची डोंगरे

 


प्रदूषणाने हैराण झाले वणीकर, लोकप्रतिनिधी झाले निष्क्रिय

News Today 

दिलीप भोयर

वणी :-  येथील शहरालगत असलेल्या विठ्ठलवाडी परिसरातील रेल्वे साईडींगवर लाखो टन कोळसा साचविल्या जात असल्याने काळ्याकुट्ट कोळशाचे जणू  डोंगरच उभारले असावे असे चित्र निर्माण झाले असून या कोळशाच्या प्रदूषणाने संपूर्ण शहर हैराण असून या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय पणाचा कळस कारणीभूत ठरत असल्याचे आरोप जनतेतून केल्या जात आहे.

वणी परिसरात अनेक वेकोली व खासगी कोळसा खानी असून या खाणीतून निघणारा लाखो टन कोळसा इतरत्र लागणारे उत्पादन  करण्यासाठी रेल्वेने वाहतूक केल्या जात असतात यासाठी शेकडो हायवा टीप्परने हा कोळसा साठवणूक केल्या जात असतात यात प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक प्रशासन यांचे कडून अनेक नियम व अटी लादून दिल्या आहे. परंतु सत्तेतीलच लोक या कोळशाच्या काळ्या दलालित आपले हात काळे करून बसल्याने वाहतुकीच्या नियमांचे व कोळसा साठवणुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवून प्रदूषणात भर घालत आहे. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी असून वाढलेल्या प्रदूषण संदर्भात रोष व्यक्त केल्या जात आहे.