Ticker

6/recent/ticker-posts

चिलई शिवारात शेतातील गोठा जळून लखोचे नुकसान

 

News Today

वणी :- तालुक्यातील चिलई शिवारातील एका शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या जनावरांचा गोठा  जळून खाक झाल्याने सदर शेतकऱ्यांचे ५ ते ६ लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे.

चिलई येथील शेतकरी शरद पाटील बोढाले यांच्या शेतात जनावरांचा गोठा असून या गोठ्यात त्यांची बैल जोडी, दोन गायी व पाळीव कोंबड्या असायच्या तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य होते. त्यात स्पेरींग पंप, झटका मशीन व शेतपिकासाठी लागणारे रासायनिक खते अचानक लागलेल्या आगीत त्यांचे बैल, गायी, कोंबड्या, ९० बॅग रासायनिक खते, झटका मशीन, स्प्रे पंप तसेच शेतीचे संपूर्ण साहित्य जळून राख झाली आहे. यत्त्यांचे जवळपास ५ ते ६ लाखाचे नुकसान झाली आहे. ही आग कशाने लागली हे मात्र अजून समजू शकली नाही. या आगीने सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.