News Today
प्रतिनिधी
यवतमाळ :- पळसवाडी पोलीस वसाहतीला लागुन असलेल्या पोलीस कवायत मैदान परिसरात वृक्ष रोपण करून आई वडिलांना स्व. शंकरराव कवरासे, गिरिजाबाई कवरासे ,यांचे स्मृती अभिवादन करण्यात आले आहे.
पोलिस सेवेतील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे, पो.अंमलदार सचिन दरेकर, पवन काळे, वंदना कवरासे, कल्पना शेखदार, कु.हेतल शेखदार यांनी या परिसरात कडूनिंब, पिंपळ, मोहगणी, दुबई र्टी, शिसम अश्या अनेक झाडाचे वुक्षारोपन करून वडिलांच्या स्मृतीला उजाळा दिला. व संपूर्ण झाडे संवर्धनाची, संगोपनाची जबाबदारी स्विकारली त्यांनी आजपर्यंत ३५० झाडांचे संगोपन करून झाडे जगविली व पर्यावरण राखण्यासाठी मोलाचे कार्य केले.