Ticker

6/recent/ticker-posts

विर एकलव्य युवा आदिवासी बहुउद्देशीय संस्था मुकुटबन द्वारा जागतिक आदिवासी दिवस साजरा

 

News Today

प्रतिनिधी

मुकूटबन - 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुकूटबन येथील विर एकलव्य युवा आदिवासी बहुउद्देशीय संस्था द्वारा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. झाडे वृक्ष जंगल जल हे जिवनसृष्टीचे महत्वाचे घटक आहे. आणि हे वाचवुन जोपासुन वाढविणे गरजेचे आहे. व हेच कार्य अगदी प्राचीन काळापासून आदिवासी बांधव करीत आले व करीत आहे. हि परंपरा कायम स्वरूपी जपने काळाची गरज आहे. 

  जंगल राहील तर निसर्गरम्य वातावरण समतोल ठेवता येईल. असा संदेश आजच्या या कार्यक्रमातुन देण्यात आला. कार्यक्रमाचे सुरूवातीस आदिवासींचे प्रेरणास्थान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत जय जंगो ला मानवंदना देण्यात आली. नंतर वैचारिक चर्चा करून कार्यक्रमाची आटोपता झाली. 

   यावेळी कुणाल नागभिडकर, रमेश गेडाम, जिवन मेश्राम, दिनेश परचाके, हेमंत गेडाम, संजय परचाके, सुरज परचाके, विनोद गेडाम, लक्ष्मण परचाके,  नागोराव टेकाम, परचाके सर, सचिन आञाम, धनराज पंधरे आणि महीला मध्ये सौ. मोनाली गेडाम, प्रतिभा परचाके, सिंधुताई गेडाम, अंबुताई कुमरे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी मनोज गेडाम, राम जुमनाके, विकी मडावी इत्यादीचे सहकार्य लाभले.