Ticker

6/recent/ticker-posts

अखंड हरिनाम सप्ताहाला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट

 

संतोष मुळे

प्रतिनिधी News Today 

सांगली : श्री विश्वसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधीनिमित्त कडेगाव तालुक्यातील उपाळे मायणी येथे व संजीवनी समाधी सोहळा चालू आहे. यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून गावकऱ्यांच्या उत्साहात भर घातली.

या सप्ताहात दि २५/७/२०२४ ते २/८/२०२४ रोजी पर्यंत. रोज काकड आरती,ज्ञानेश्वरी वाचन,प्रवचन कीर्तन,जागर असे दिनक्रम चालू असतो. या हरिनाम सप्ताह महत्त्व जे वारकरी माऊलींच्या दिंडीला वारीसाठी जातात,परतीच्या प्रवासावेळी उपाळे मायणी या गावातून जात असतात ते सर्व वारकरी व सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने गावस्वरूपी  अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात असतो. या हरिनाम सप्ताहला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, राज्य महाराष्ट्र व श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज कडेगांव,जिल्हा सांगली या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. ह.भ.प संभाजी महाराज रेठरेकर यांचा सत्कार भिकू वेल्हाळ, सरपंच .बापू माने  यांचा सत्कार सचिन कराडकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन कदम यांचा सत्कार महादेव पंतगे यांनी केला. यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, राज्य महाराष्ट्र प्रदेश प्रदेश प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज कडेगांवचे अध्यक्ष जयंत वेल्हाळ,माजी उपाध्यक्ष महेश पंतगे,उपाध्यक्ष मानव परदेशी, संजय महाडीक,नगरसेवक निलेश लंगडे,श्रीनिवास आंबेकर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.