सत्तेतील पुढाऱ्यांनी राजकीय दबाव टाकून निष्पाप महिलांवर केले गुन्हे दाखल - अजिंक्य शेंडे यांनी केली चौकशीची मागणी
अजिंक्य शेंडे
News Today
प्रतिनिधी
वणी :- येथून जवळच असलेल्या मंदर येथील एका धाब्यावर अवैध्य दारू विकल्या जात असल्याने संतप्त गावातील महिलांनी धाब्यावर धाड टाकून दारू जप्त केली व धाब्याला आग लावून पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली होती यातील धाबा चालकांनी महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करून महिलांवरच गंभीर गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. महिलांवर गुन्हे नोंद करण्यासाठी सत्तेतील एका लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे नोंद करायला लावल्याचे आरोप युवासेनेचे (उबाठा) गटाचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केला आहे. व या प्रकरणाची उचित चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मंदर जवळील वन विभागाच्या नर्सरी समोर एका ढाब्यावर मागील अनेक दिवसांपासून अविध्य दारू विकल्या जात असल्याने अनेकदा पोलिस प्रशासनाला सांगूनही कारवाई होत नव्हती म्हणून गावातील असंख्य महिलांनी आपले तरुण पोरं व्यसनाच्या नादी लागत असल्याने व गावात भांडण तंटे वाढत जावून महिलांवर अत्याचार वाढत असल्याने संतप्त होऊन धाब्यावर धाव घेतली व तेथील दारूच्या बाटला व काही साहित्याची नास धुस केली. यातच धाब्याला देखील आज लावून दिली या प्रकरणातील सर्व महिलानी पोलिस स्टेशन गाठून पोलीसात तक्रार नोंदविण्यासाठी गेल्या होत्या परंतु काही लोकांनी प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी महिलांना विनंती केली यावरून दिवसभर पोलिस स्टेशन मध्ये उपवाशी असलेल्या महिला अखेर घरी निघून गेल्या परंतु त्या नंतर धाबा चालकांनी पोलीसात येवून महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अगोदर त्यांना हाकलून लावले परंतु लगेच सत्तेतील एका लोकप्रतिनिधींचा पोलिसांना फोन आला व लगेच राजकीय दबावात येवून निष्पाप महिलांवर गुन्हा दोंड करण्यात आल्याचा आरोप अजिंक्य शेंडे यांनी केला असून पोलिसांना फोन करून दबाव टाकणारा हा सत्तेतील लोकप्रतिनिधी " माम" कोण याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अजिंक्य शेंडे यांचा आरोप अप्रत्यक्षरित्या खाजपचे आमदार यांचेवर दिसून येत होता. घटनेने गावात वातावरण संतप्त झाले असून या लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत दिसून आहे.
हे तर लाडक्या बहिणीचे वैरी सरकार - दिलीप भोयर
एकीकडे लाडकी बहिण म्हणून महिलांना संबोधून त्यांना १५०० रुपये महिना द्यायचा आणि दुसरीकडे याच लाडक्या बहिणींनी पुकारलेल्या अवैध्य दारूच्या विरोधातील बंडाला शह देण्यासाठी त्यांचेवर सत्तेतील पुढाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकायचा आणि गोर गरीब महिलांवर गंभीर गुन्हे नोंद करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करायचे जने करून कोणत्याही महिलेने अवैध्य दारू व्यवसायाच्या विरोध करू नये यासाठी केलेला हा प्रकार म्हणजे हे तर लाडक्या बहिणीचे हे वैरी सरकार आहे असा आरोप श्रीगुरूदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केला आहे.