Ticker

6/recent/ticker-posts

शालिनीताई रासेकर प्रदेश सचिवपदी

 





वणी: शालिनीताई रासेकर यांची राजीव गांधी पंचायतराज संगठणच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली. राष्ट्रीय अध्यक्षा मीनाक्षी नटराजन यांनी ही नियुक्ती केली. याबाबत महाराष्ट्र प्रभारी नारायणसिंह राठोड,  प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. 
 शालिनीताई रासेकर या वणीच्या नगराध्यक्ष होत्या. विवेकानंद प्राथमिक विद्यालयातून त्या सेवावृत्त झाल्यात. सामाजिक क्षेत्रांतही त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. त्यांच्या यानिवडीबद्दल कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.