News Today
प्रतिनिधी
वणी, लगत गणेशपूर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे भव्य नंदीबैल सजावट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जवळपास तीनशे नंदी चा सहभाग दिसून आला. यात गावातील चिमुकल्याने शेतकऱ्यांच्या वेषभुषेत सहभागी होऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय देरकर वणी विधानसभा अध्यक्ष शिवसेना (उबाटा ), उदघाटक म्हणून पवार सचिव गणेशपूर, प्रमुख पाहुणे म्हणून किरण देरकर, तेजराज बोढे, स्वप्नील बोकडे, डॉ जगन जुनघरी, भगवान मोहिते, गणेश काकडे इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सहभागी प्रत्येक बालगोपालांना छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे, उपाध्यक्ष प्रशांत काळे, सचिव राहुल घुगुल, कार्याध्यक्ष भुवणेश्वर तूरकर, कोषाध्यक्ष संतोष सोयाम,सहसचिव चेतन गावंडे, सहकार्यअध्यक्ष विकास पेंदोर, मुख्यमार्गदर्शक गणेश काकडे, गजानन चंदावार, वैभव ठाकरे, प्रवीण खानझोडे,मुख्यसदस्य स्वप्नील थेरे, मंगेश झाडे, श्रीतेश धुरतकर, गौरव काळे, हर्ष घाटे, विशाल पेंदोर, हर्षल मालेकर, निखिल एकरे, शुभम भोंगळे, उमंग कोंगरे, जगन्नाथ काळे, हनुमान सोयाम, अक्षय चिंचोलकर, बाबाराव गेडाम यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.