Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथील ग्रामगीता मंदिर हडप करू पाहणाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई

 


News Wani Today

डी. एस.अडकीने

वणी :- पंढरपूर येथील  ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर व त्यांची मिळकत हडप करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सचिव दिलीप भोयर यांनी अशी माहिती प्रसिद्धस दिली आहे तर दिलीप भोयर यांनी या कारवाई करिता चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व परमपूज्य कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रेरणेने उदयास आलेले संयोजक म्हणून ब्रम्हलीन लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या नावाने पंढरपूर येथे सर्व्ह नंबर ४५/१ क्षेत्र ०.८२ हे आर शेतजमीन खरेदी करण्यात आली व या शेतजमिनीवर लोकसहभागातून भव्य ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर उभारण्यात आले. व या मंदिराची भु-वैकुंठ समितीची निर्मिती झाली व ती अनोंदनिकृत आहे. ती लोकमान्य असल्याने तिला नोंदणीची गरज नाही. अश्या या मंदिराचे संयोजक म्हणून कार्यकरणारे नारखेडे दादा यांनी माझे नंतर संयोजक म्हणून सेवकाराम मिलमिले हे असतील असे मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. परंतु सेवकाराम यांच्या संयोजक होण्यास काही समितीतील लोकांना मोठी अडचण तयार झाली होती. कारण सेवकाराम हे सर्वस्वी समर्पित असल्याने त्या ठिकाणचा मलिंदा लाटणे अवघड होणार होते हे त्यांना समजून आले होते. म्हणून त्यांनी सदर मिळकतीवरील ७/१२ फेरफार करतेवेळी खोटे , नाटे आरोप लावून फेरफार नोंद रद्द केली व समितीला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता सेवकराम यांचे विरुद्ध कोर्टात दावा केला व समितीला याची माहिती मिळताच आपसी समझोता करून प्रकरण निपटारा करायचे ठरवले यावेळी साध्याभोळ्या सेवकरामच्या स्वभावाचा फायदा घेऊन समझोता कंरण्यात आला परंतु समझोता करतेवेळी कोर्टाने आपला हुकूमनाम्यात नमूद केले आहे की सदरची संस्था ही प्रचलीत कायद्याने नोंदणी करण्यात यावी असे असताना देखील कपटी व धूर्त संधीसाधू नितीच्या लोकांनी अखिय भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे १६२ रजीष्टर क्रमांक जोडला व मुळ समितीलाच डावलण्याचा प्रयन्त केला व तसा न्यायालयात दावा ही केला आहे. आणि मागील २ महिने अगोदर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे काढून सेवकराम यांना धाकदपट करून त्यांचे जवळील मंदिराच्या खोल्यांच्या चाव्या घेऊन मंदिर आपल्या ताब्यात घेण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. या षडयंत्रात महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील एक मंत्री यांचे मंत्रीपदाच्या पॉवरचा वापर करून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचेकडे कोर्टाचा कोणताही आदेश नसताना मंदिरावर ताबा मिळविल्याच्या तोऱ्यात आले होते. त्यामुळे सदर मंदिर समितीचे सचिव दिलीप भोयर यांनी सदर प्रकार अनेक राजकीय पक्षाच्या लोकांच्या कानात टाकून येथे मदत करायला विन्नती केली. परंतु कोणीच मदतीला देखील धावत नव्हते त्यामुळे माजी राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष  संजीवनीताई बारंगुळे यांच्याशी संपर्क झाला असता त्या तात्काळ बार्शी येथून पंढरपुरात दाखल होताच पंढरपुरातील असंख दिव्यांग बांधव एकत्रित आले व त्यांनी सर्व बाजू ऐकून सीसीटीव्ही काढणाऱ्या इसमावर गुन्हा नोंद करायची मागणी पोलीस स्टेशन ला लावून धरली शेवटी सीसीटीव्ही काढणाऱ्याला कॅमेरे लावून द्यावे लागले. या कामासाठी  मंत्र्यापासून दबाव असल्याने पंढरपूर पोलीस कारवाई करिता धजावत नव्हते. शेवटी कायद्यापुढे कोणाचेही चालत नाही हे सिद्ध झाले व ठाणेदाराला सीसीटीव्ही काढणाऱ्यावर सीसीटीव्ही लावून देणे भाग पाडले. या सर्व प्रकाराला एका दिव्यांग लोकांनी प्रामाणिक मदत केली हे मात्र विशेष.



खोट्या तक्रारीमुळे पोलिसांसमोरच सेवकाराम मिलमिले यांची प्रकृती अत्यावस्थ

   सीसीटीव्ही काढून खोटे आरोप लावून सेवकाराम मिलमिले यांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार विरोधकांनी सुरू केल्याने कधीही पोलीस स्टेशन न बघणाऱ्या सेवकाराम यांना पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत आहे. यात एका अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या महत्वाच्या पदावर विराजमान असलेल्या मंत्र्यांच्या दबावाला  पोलीस प्रशासनाकडून सेवकराम यांचेवर मानसिक त्रास देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून यात अश्याच एका खोट्या तक्रारीवरून काल ता. १७ रोजी सेवकाराम यांना पोलिसांनी चौकशी करिता बोलावले असता. त्यांच्यावरील खोटे आरोप बघून त्यांची प्रकृती अत्यावस्थ झाली होती. त्यांना पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालत दाखल करण्यात आले होते नंतर त्यांना खासगी रुग्णालयातून उपचार घेण्यास सांगितले त्यांच्या सर्व तपासण्या केल्या असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.


भु-वैकुंठ समितीतील ३ कुरापाऱ्यांची हकालपट्टी

ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर भु-वैकुंठ समितीत सातत्याने उपद्रव करणारे तीन कुरापत्यांची या अगोदरच त्यांना त्यांचे पदावरून निष्कशीत करून हकालपट्टी करण्यात आली आहे. यात ता.२६ मे २०२२ रोजी झालेल्या आमसभेत समितीच्या सदस्यपदावर असलेले राजेश ठाकरे तर ता. १३/७/ २०२२ रोजीच्या सभेत सचिव नथ्थू भुते, व्यवस्थापक सुधीर ठाकरे यांनी समिती सोबत गैरवर्तन करणे व समिती अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या घशात घालणे अश्या पद्धतीचे आरोप लावून त्यांना त्यांचे पदावरून निष्कशीत करुन त्यांची समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तेव्हा या समीतिच्या कोणत्याही सदस्यांनी या निष्कशीत लोकांसोबत कसलाही संपर्क करून नये असे आवाहन समितीचे अध्यक्ष जनार्दन देठे गुरुजी यांनी केले आहे. यावेळी समितीचे संचालक सेवकाराम मिलमिले, कार्याध्यक्ष, रघुनाथ माचेवाड, सचिव दिलीप भोयर, सदस्य दत्तूजी पारखी, गजानन महाजन,सुभाष पाटील कदम, शिवराज जवळेकर, राजेंद्र घुमनर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिरवाचविण्यासाठी मदतीला धावलेले दिव्यांग बांधव

बघा व्हिडीओ