News Today
प्रतिनिधी :- रात्रीच्या दरम्यान शेतात जाने व शेतातील शेतकऱ्यांचे शेतसाहित्य व शेतातील शेतमाल चोरून आणणे अश्या चोरट्याला सीसीटिव्ही पुटेजच्या आधारे ओळखून गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना तालुक्यातील सुकानेगाव येथे नुकतीच घडली असून तसा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे.
सध्या उन्हाळ्याचा सीजन सुरू असल्याने शेतातील खरीप हंगामाची कामे सुरू व्हायची आहे. त्याच बरोबर शेतमालाला बाजार भाव नसल्याने अनेक शेतकर्यांनी आपला शेतमाल ज्यात कापूस,सोयाबीन, तूर, मिरची,चणा, मग व इलेक्ट्रिक झटका मशीन साठी लागणारी बॅटरी इतर साहित्य शेतातच ठेवलेले असतात याचाच फायदा भुरटे चोर घेत असून शेतातील साहित्य व शेतमाल चोरण्यासाठी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भुरटे चोर हात साफ करीत आहे. मागील एक महिन्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीचे साहित्य व शेतमाल चोरी झालेल्या अनेक घटना घडल्या आहे. अशीच घटना सुकणेगाव येथे घडली असता शेतात सीसीटिव्ही कॅमेरे लावून आल्याने चोराची ओळख पटली असता त्याला गावातील काही लोकांनी पकडुन चांगला चोप दिल्याची घटना नुकतीच एक दोन दिवसा आदी घडल्याची समजले आहे. चोरटा हा गावातीलच असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार मात्र पोलिसात नोंदवली नाही.
बघा व्हिडिओ