Ticker

6/recent/ticker-posts

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेसाठी मतदारांनी फिरवली पाठ

 

पांढरकवडा येथील भाजपच्या प्रचार सभेतील मतदारांनी पाठ फिरविल्याचे रिकाम्या पडलेल्या खुर्च्या

पांढरकवडा येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फ्लॉप शो,  

ओबिसीला उमेदवारांना डावलने भाजपला पडले महागात

News Today

प्रतिनिधी

पांढरकवडा :- १३ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले  असून पहिली टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा मतदार संघात निवडणूक संपन्न होत आहे. यातील महायुती व भाजपचे उमेदवार  सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पांढरकवडा येथे केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन केले असता या सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे गडकरी यांच्या सभेचा शो फ्लॉप झाल्याने भाजपच्या गोठ्यात कमालीची नाराजी पसरली आहे.  भाजपा कडून ओबीसी समाजाची उमेदवारी नाकारल्याने याचे परिणाम या प्रचार सभेतून निदर्शनास येत आहे. सुरवातीला थोडी फार गर्दी दिसून आली असली तरी नेत्यांच्या भाषणावेळी मात्र गर्दी ओसरू लागली होती.

येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका संपन्न होत आहे. यातील चंद्रपूर आर्णी - वणी लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार हे ओबीसी समाजाचे असून त्यांच्या सोबतीला एस. सी. एस. टी. विजेएनटी व मुस्लिम समाज मतदार जवळपास १२ ते १४ लाखाच्या वर संख्या आहे. असे असताना देखील भाजपाकडून ओबिसी समाजाच्या नेतृत्वाला डावलून केवळ २ ते ३ हजार मतदान असलेल्या आर्य वैश्य कोमटी (सावकार) समजला उमेदवारी दिल्याने ओबीसी समाजात मोठी नाराजी पसरली आहे. या नाराजीचा परिणाम आता भाजप नेत्यांच्या प्रचार सभेत दिसून येत आहे. आयोजकांनी आयोजित केलेल्या प्रचार सभेतील शेकडो खुर्च्या रिकाम्या दिसून आल्याने उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. 

महागाई व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे धोरण ठरविण्यात भाजप पुर्णतः फेल झाल्याने सर्व सामान्य नागरिक मात्र चांगलेच नाराज आहे. त्यामुळे भाजपच्या सभेला देखील जाण्यास निरुत्साही असल्याचे दिसून आले आहे. पांढरकवडा येथील सभेत भाजपचे आमदार व अनेक पदाधिकारी उपस्थित असेल तरी मतदारांची अनुपस्थिती बघून मात्र नेते मंडळींचा चांगलाच हिरमोड झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.