Ticker

6/recent/ticker-posts

दहेगाव (घोंसा) परिसरात वीज पडून तरुण शेतकऱ्याच्या दुर्दवी मृत्यू

 


News Today

दिलीप भोयर

वणी :- तालुक्यातील दहेगाव (घोंसा) शिवारात आज ता. ४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास  आलेल्या जोरदार पावसामध्ये शेतात काम करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्यावर वीज पडल्याने सदर शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. 


दहेगाव येथील मनोज पांडुरंग गोहकार वय ३३ असे मृत्यपावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकऱ्याचे गोदाळा (उ.) शिवारात तीन एकर शेती असून आज ते शेतात काम करीत होते. आज दुपारी अचानक आकाशात काळे काळे ढग साचून विजेच्या कडकाळाटासह जोरदार पाणी पडला असता शेतात आंब्याच्या झाडाखाली असलेल्या झोपदीमध्ये मनोज हे आसरा घेण्यासाठी गेला होता. त्याच आंब्याच्या झाडाखाली असलेल्या झोपडीवर वीज कोसळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पाठीमागे वृद्ध आई - वडील, पत्नी, व दोन लहान मूल आहे. त्याच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण दहेगावात शोककडा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अशी माहिती घोंसा ग्राम पंचायतिचे सरपंच मंगेश मोहूर्ले यांनी दिली आहे.