Ticker

6/recent/ticker-posts

ठेकेदाराकडून ५० लाखाची लक्झरी गाडी भेट, २६ कोटीच्या रस्त्याचा कार्यक्रम झाला सेट

 

एका फॉर्चूनर गाडी साठी २६ कोटीच्या रस्त्याची ऐसीतैसी

कंत्राटदाराने ५० लाखाची गाडी एका नेत्याला दिल्याची चर्चा

Wani Today

दिलीप भोयर

       वणी :- येथील चालू असलेल्या २६ कोटी रुपयांच्या रस्ता काँक्रिट करणाच्या कामातील अनियमिततेवर कोणतीही कारवाई करू नये या करिता कंत्रादारांकडून सत्तेतील एका पुढाऱ्याला तब्बल ५० लक्ष रुपये किमतीची एक फॉर्चूनर चारचाकी वाहन भेट दिल्याची जोरदार चर्चा संपूर्ण शहरात रंगत आहे. 


      वणी शहरातील चिखलगाव चौफुली ते साई मंदिर चौका पर्यंत मागील वर्षी साडे चार कोटी रुपयाचे काम सर्व नियम व अटींना डावलून तांत्रिकदृष्ट्या बोगस केलेले काम अवघ्या एका वर्षात उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.  त्याच बरोबर साई मंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतचे काम २२ कोटीचे असून तेही काम नंदेश्वर देवस्थान ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत निविदेतील सर्व तांत्रिक बाबी धाब्यावर बसवून पेव्हर मशीन ऐवजी हात कामगाराने नित्कृष्ट दर्जाचा रस्ता बांधकाम करण्यात आला आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्याने कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांनी डोळे झाकून चौकशी केल्याचा आरोप होत आहे.

       सदर काम हे पेव्हर मशीन न वापरल्याने टेंडर मधील शेड्युल बी नुसार ते काम उखडून फेकायला पाहिजे होते. परंतु ते जसेच्या तसे ठेवण्यासाठी सत्तेतील राजकीय दबाव गरजेचा होता यासाठी कंत्राटदाराने ५० लाखाची फॉरच्युनर गाडी नागपूर येथील शोरुम मधून घेतली व ती गाडी सत्तेतील एका पुढाऱ्याला भेट दिली आणि चार महिने थांबलेले काम सुरू केले. 



    काम सुरू करतेवेळी पेव्हर मशीन तर आणली परंतु तिचा वापर मात्र नाममात्र करण्यात आला आहे. एक साईड पेव्हर ने रस्ता बांधकाम तर एक साईड हात कामगाराने करण्यात आले आहे. 

पेव्हर मशीन लावूनच काम करणे अनिवार्य असताना हात कामगार लावून काम पूर्ण करणे हे नियमांना डावलून केलेले काम आहे.  तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारावर मेहरबानी करताना दिसून येत आहे. 




        भेट मिळालेली फॉर्चुनर जशीच्या तशीच घरी उभी

कंत्राटदाराने केलेले बोगस बांधकाम उखडून फेकू नये यासाठी ५० लाखाची फोर्चूनर वाहन घेणाऱ्या पुढाऱ्यांच्या घरी ती जशेच्या तशे लावून आहे. त्यामुळे या पुढाऱ्यांचे बोगस व नित्कृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर हात कारवाई करिता धजावत नाही. या प्रकरणी कंत्राटदार व लोकप्रतिनिधींच्या बँक खात्याची चौकशी केल्यास सर्व पितळ उघड होण्याची चर्चा आहे.

                          कामाचे ऑडिट गरजेचे

शहरातील मुख्य रस्त्याचे कोंक्रेटी करण करण्यासाठी रस्त्यावरील जुने डांबरीकरण फोडून त्या डांबराची भुकटी करायला पाहिजे. परंतु कंत्राटदार मात्र जेसीबी च्या साहाय्याने केवळ रस्ता फोडून त्यावर ८० एम एम खडी न करता बेड टाकून काँक्रिट पसरविल्या जात आहे.  त्यामुळे या कामाचे तंतिकदृष्या ऑडिट करणे गरजेचे आहे.