Ticker

6/recent/ticker-posts

भुते यांचे वरील प्राण घातक हमल्याची ती माहिती बनावट

 

खोटी माहिती पसरवून श्री गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा घाट रचणार्यावर कारवाईची मागणी

News Wani Today

विशेष प्रतिनिधी

वणी :- एका वॉट्सअप्प ग्रुपवर काल ता.५ नोव्हेंम्बर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर येथे भुते यांचेवर प्राण घातक हमल्याची माहिती खोटी निघाली असून अशी खोटी माहिती पसरवून श्री गुरुदेव कार्यकाऱ्यांमध्ये फूट पाडून समाजात रोष निर्माण करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची मागणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला सेवकराम मिलमिले यांनी केली आहे. 

    पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर भु-वैकुंठ समितीचे माजी सचिव भुते हे पंढरपूर येथे कार्तिकवारी करिता आले आहे. समितीने घेतलेल्या १३ जुलैला २०२२ च्या सभेत त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे भुतेसह व्यवस्थापक ठाकरे यांना ही समितीतून निष्कशीत करण्यात आले आहे. ते सचिव पदावर असताना त्यांच्याकडे समितीचे सर्वच रेकार्ड आहे. त्यामुळे त्यांनी रेकार्ड जमा करायला पत्र देखील देण्यात आले आहे. परंतु त्यांनी अद्याप पर्यन्त रेकार्ड जमा न केल्याने समितीला कामकाज करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने समितीचे संचालक / ससंयोजक सेवकराम मिलमिले, अध्यक्ष जनार्दन देठे गुरुजी, सचिव दिलीप भोयर, उपस्थित सदस्य रघुनाथ माचेवड, गजानन महाजन, राजू घुमणार, दत्तूजी पारखी यांनी भुते यांना त्यांच्याकडे असलेले नियमानुसार समितीकडे जमा करण्यासाठी सकाळी ८ वाजता स्मरण/ , घेऊन गेले असता त्यांनी सदरचे पत्र पोष्टाने पाठवा म्हणून पत्र घेण्यास नकार दिला व ते निघून गेले. पत्र देतेवेळी या सर्व प्रकारची मोबाईल मध्ये व्हिडीओ घेण्यात आला या व्हिडीओ मध्ये कुठंही कोणीही हमला किव्हा अरेरावी करताना दिसून येत नाही.  भुते हे पत्र नाकारून निघून गेल्यानंतर सर्व समितीच्या लोकांसोबत सकाळी ९ वाजता एकादशीचा उपवास सोडून आनंदाने जेवण देखील केले.  समितीचे सदस्य गजानन महाजन  यांनी सर्वांना आनंदाने जेवण वाढले व भुते हे जेवण करून मंदिराचे बाहेर निघून गेले व थोड्यावेडातच चिमूर येथील सारंग धाबेकर नामक व्यक्तीने वॉट्सअप्पच्या एका ग्रुपवर भुते यांच्यावर प्राणघातक हमला म्हणून खोटी माहिती पासरविण्याची पोष्ट टाकली. त्यामुळे श्री गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला. यात नाहक सेवकराम व राजू घुमनर आणि समितीची नाहक  बदनामी झाली. त्यामुळे समाज माध्यमातून खोटी माहिती पसरविणाऱ्यावर व त्यांना खोटी माहिती पुरविणाऱ्यांची चौकशी करून सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेवकाराम मिलमिले यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

हीच ती खोटी व बनावट वायरल पोष्ट 

खाली बघा व्हिडीओ.
बघा व्हिडीओ .

यात कुठंही कोणीही हमला केला नाही

सर्व जण शांततेत चर्चा करीत आहेत.