Ticker

6/recent/ticker-posts

पत्नीची हत्या करून मृत्यदेह पाण्यात फेकला, आरोपी पती फरार

 

अज्ञात महिलेची ओळख पटली, मोहदा येथील घटना

News Today

दिलीप भोयर

वणी :- तालुक्यातील मोहदा येथील बंद गिट्टी खाणीत सापडलेल्या अज्ञात महिलेल्याच्या  मृत्यदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या काहि तासातच घटनेचा उलगडा केला केल्याने शिरपूर पोलिसांचे कौतुक केल्या जात आहे. 


तेथील गिट्टी खदाणीवर काम करणारे राजेंद्र प्रजापती हे आपल्या दोन पत्नीसह तेथे राहत होते. पती पत्नी मध्ये नेहमी खटके उडत असायचे यातच पती राजेंद्र यांनी आपली पत्नी सरिता प्रजापती हिची हत्या केली व तिचा मृत्यदेह  गिट्टी खदाणीतील साचलेल्या पाण्यात फेकून दिला व तो फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी खदाणीतील पाण्यात एका महिलेचा मृत्यदेह तरंगत असल्याची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक गजानन कारेवाड यांनी घटनेचे गांभिर्य लक्षत घेऊन तात्काळ सदरची माहिती डीवायएसपी गणेश किंद्रे यांना दिली असता डीवायएसपी गणेश किंद्रे व  ठाणेदार गजानन कारेवाड हे  घटनास्थळ गाठले व तपसचक्र वेगाने फिरवून सदर महिलेची ओळख पाठविली व कसून चौकशी केली असता सदर महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आणले.  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पी आय गजानन कारेवाड हे करीत आहे.