Ticker

6/recent/ticker-posts

गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांची धाड, सात आरोपी अटकेत, ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त

 

News Today

प्रतिनिधी

वणी :-   अवैधरित्या जंगली भागात गावठी दारू भट्टीवर दारू काढत असल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ धाड टाकली असता सात आरोपींना जागेवर अटक करून संपूर्ण दारूभट्टी उद्धवस्त  करण्यात आली आहे. ही कारवाई काल दि. १९ रोजी करण्यात आली आहे. 


यात आरोपी तुकाराम चंद्रभान दांडेकर वय 55 वर्ष, राजू भावराव जिवतोडे वय 45 वर्ष ,  रामक्रुषण घुलाराम उमाटे वय  42 वर्ष , शकील खान रोशन खान वय 45 वर्ष,  अशोक गुलाब दिघाडे वय 55 वर्ष , ज्ञानेश नानूशा पवार वय 20 वर्ष , सौ.पवनशा ज्ञानेश पवार वय 20  वर्ष सर्व रा. सावर ता.बाभुळगांव, जि.यवतमाळ. याचे कडून एक मोटर सायकल, दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य , ६०० लिटर मोहामाच सडवा रसायन, लोखंडी ड्राम, जर्मन टोपले, पिपे , पलास्टिक ड्राम, गावठी हातभट्टीची दारू , असा एकूण अंदाजे ८५ हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई ग्राम सावर शेतशीवार आळनद नाल्याचे काठावर करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजजलवार यांचे मार्गदर्शनाथ  पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर मातकर, खुशाल राठोड, सुरेश डाखोरे यांनी परिश्रम घेऊन पार पाडली .