Ticker

6/recent/ticker-posts

बनावट डिझेल प्रकरणी हिलटॉप हॉयराईन कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर किंवा मालकावर गुन्हा करा

 

शिवसेना (शिंदे) शहराध्यक्ष ललित लांजेवार यांची मागणी


News Today

प्रतिनिधी

वणी:-  तालुक्यातील वे. को. लि. वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत कोलार पिंपरी खुल्या खदानीत काम करणा-या हिलटॉप हायराईन कंपनीत गोपनीय माहितीच्या आधारे दि. १८-१२-२०२३ रोजी बनावट २१ लाख रुपयांचे डिझेल व १५ लाख रुपयांचा टँकर असा ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल वणी पोलीसांनी ताब्यात घेतला यात प्रोजेक्ट मॅनेजर व कंपनी मालकांना गुन्हेगार बनवले नसून त्यांनेवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गटाचे) ललित लांजेवार यांनी मागणी केली आहे. 

या प्रकरणात केवळ पुरवठादार कंपनी व टैंकर चालक यांच्यावर दि. २१-१२-२०२३ रोजी एफआयआर.क. १४३६/२०२३ अन्वये गुन्हा सुध्दा दाखल केला. मात्र ते डिझेल विकत घेणारी व त्या कंपनीत काम पाहणारा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा कंपनीच्या मालकावर गुन्हा का दाखल का केला नाही? या कृत्यात जितका पुरवठा करणारा दोषी आहे तितकाच काम पाहणारा प्रोजेक्ट मॅनेजर व कंपनी मालक  सुध्दा तितकाच दोषी आहे. यांना का सोडण्यात आले आहे.असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

कोलारपिंपरी येथील वेकोली क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून हील टॉप ही कंपनी काम करीत आहे. यापुर्वी सुध्दा हेच बायोडिझेल वापरीत असेल ही शक्यता नाकारता येत नाही. पुरवठादार कंपनी व डिझेल विकत घेणारी कंपनी यात आर्थिक व्यवहार झाला नसता तर गुजरातचे तार कोलार पिंपरी (महाराष्ट्र) मध्ये जुळलेच नसते.हि लटॉप हायराईन या कंपनीच कोलार पिंपरी खदान मध्ये पुर्ण काम प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून राजू रंजन सिंह काम पाहत असून या व्यवहाराची पूर्ण माहिती/कल्पना त्याला होती.  प्रोजेक्ट मॅनेजरच्या परवानगी शिवाय हिलटॉप हायराईन कंपनीच कुठलेही काम होत नाही, ही तर बनावट डिझेल खरेदी आहे ? राजू रंजन सिंह यांनी स्वतःचा जिव वाचविण्यासाठी स्वानिक पोलीस प्रशासनासोबत आर्थिक व्यवहार करुन थातूर-मातूर कारवाही दाखवून ट्रकचालक, अनोळखी लोकांवर व पुरवठादार कंपनीवर गुन्हा दाखल केला. मात्र मुख्य सुत्रधारांवर वा हिलटॉप कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल का केला नाही. असा प्रश्न लांजेवार यांनी उपस्थित करीत प्रोजेक्ट मॅनेजर व मालकावर देखील गुन्हा नोंदविण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन पोलिस महासंचालक यांना देण्यात आले आहे. यात खालील मागण्या करण्यात आल्या आहे. हिलटॉप हारयसईन कंपनीच्या Project Manager राजू रंजन सिंह यांच्यावर व कंपनीच्या मालकावर सुध्दा तात्काळ गुन्हा दाखल करावा, पुरवठादार कंपनी व डिझेल विकत घेणा-या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची संपूर्ण तपासणी करावी, या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाही करावी. अन्यया वा न्याय मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, याची दखल घ्यावी असा इशारा ललित लांजेवार यांनी दिला आहे.