Ticker

6/recent/ticker-posts

जंगोम दल नगरसेवकांचा कोणत्या पक्षात प्रवेश नाही - कालिदास अरके

 

News Today

प्रतिनिधी

झरी जामणी :- गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय जंगोम दलाचे ४ नगरसेवकानी भाजपमध्ये प्रवेश केल्याची अफवा भारतीय जनता पार्टीतर्फे उडविण्यात येत आहे. मात्र अशा खोडसाळ बातम्यांमध्ये काहीही तत्थ्य नसून जंगोम दलाच्या कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचे जंगोम दलातर्फे नगर सेवक तथा जंगोम दलाचे प्रवक्ते कालिदास अरके यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप तोंडघशी पडली आहे.



ज्या भारतीय जनता पक्षाच्या १७ उमेद्वारापैकी फक्त १ नगरसेवक निवडून आला आहे आणि नगरपंचायत निवडणूकीत ज्या पक्षाला जनतेनी पूर्णतः साफ केले आहे अशा भाजपात आमच्या नगरसेवकांनी प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे जंगोम दलाचे प्रवक्ते कालिदास अर्के यांनी स्पष्ट केले आहे.


कालिदास अर्के यांनी असेही स्पष्ट केले की, झरी नगर पंचायतीत आम्ही फक्त ९ उमेद्वार निवडणूक रींगणात उतरविले त्यापैकी आमचे ४ नगरसेवक निवडून आले. आम्ही जरसं पूर्ण १७ उमेद्वार रीगणात उभे केले असते तर एक हाती सत्ता आमच्या ताब्यात असती. मात्र भारतीय जनता पक्षाला त्यांचा पराभव पचवता येत नसल्याने अशा खोडसाळपणाच्या बातम्या पसरविण्यात येत आहे त्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून राष्ट्रीय जंगोम दलाचे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे, नगरसेवक अनिल आत्राम, सीमा मंडाले यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या भाजपातर्फे पसरविण्यात येत आहे. मात्र जंगोम नगर सेवक आहे तेथेच आहे आणि १ नगरसेवकाच्या पक्षात आमच्या आघाडीच्या ४ नगरसेवकांनी प्रवेश करणे म्हणजे आमच्यावर जनतेनी जो विश्वास टाकला त्याचा घात करण्यासारखे आहे. ज्या विश्वासाने जनतेने आम्हाला निवडून दिले आहे त्या विश्वासाला आम्ही गालबोट लावणार नाही. आम्ही आमच्या ठीकाणी जनतेबरोबर राहू आणि जनतेच्या विकासासाठी कार्य करू जंगोम दल प्रवक्ते कालिदास अर्के यांनी असेही स्पष्ट केले की, जर कोणाला आमच्या सोबत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.एक स्वच्छ आणि जनहिताचे प्रशासन झरि नगरपंचायतीला देणे हे आमचे पाहिले कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही नगरपंचायतीची संपूर्ण पंचवार्षिक पूर्ण होत पर्यन्त कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा आणि जनतेचा विश्र्वास तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याशिवाय आम्ही आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकाही जोमाने लढवू अशी ग्वाही राष्ट्रीय जंगोम दलाचे प्रवक्ते कालिदास अर्के यांनी दिली.