Ticker

6/recent/ticker-posts

वणी न.प. तील साडेसहा कोटीच्या निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न

 

नगर परिषदेचे उपमुख्याध्यापक जयंत सोनटक्के यांना  निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर व विशाल कांबळे, वृषभ शेख

नगर परीषदेचे मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देण्याचे षडयंत्र 

 निविदेतील जाचक अटीचां खुलासा करण्यासाठी वंचितचे दिलीप भोयर यांची मागणी

News Today 

प्रतिनिधी

वणी:- येथील नगर परिषद हद्दीतील काँक्रिट रस्ता, नाली व इतर विविध कामे वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत अंदाजी रुपये साडेसहा कोटींचे मंजूर असून या कामांकरिता नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी ऑन लाईन ई निविदा दिनांक २६ डिसेंबर २३ रोजी प्रकाशित करण्यात आल्या आहे. या निविदा स्थानिक मर्जीतील एकाच कंत्राटदाराला देण्याचा घाट घातला असून याबाबत वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी आक्षेप नोंदवून निविदेतील जाचक अटीचा खुलासा करण्याच्या मागणीचे निवेदन देत शासकीय नियमानुसार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रणाली व मानकांप्रमाने प्रकाशित करण्याची मागणी केली आहे. 

वैशिष्ट पूर्ण योजने अंतर्गत सात कामांकरिता ही निविदा सूचना असून यात सिमेंट काँक्रिट करिता स्वमालकीचे ६० घनमिटर प्रतीतास क्षमतेचा आर.एम.सी. प्लांट मागविण्यात आला होता. परंतु असा प्लांट कामाच्या कक्षेतील परिघीय अंतरमध्ये फक्त एकाच कंत्राटदाराकडे उपलब्ध आहे. यातील प्रत्येक कामाच्या स्वतंत्र व्याप्ती नुसार अनावश्यकपणे वाढीव क्षमतेचा प्लांट मागावून स्वामालकीचा प्लांट धारक कंत्राटदारांना वंचित ठेवण्यात आले आहे. या बाबत दिनांक २९ डिसेंबर २३ चे आक्षेपावर आज दिनांक १६ जानेवारी २४ रोजी हा प्लांट भाडे तत्वावर सुद्धा घेण्याची मुभा कंत्राटदारांना देण्यात आल्याबाबतची सुधारणा केल्याचे कळविले आहे. परंतु ही सुद्धा चक्क धूळफेक आहे. कारण कामाच्या ६० कीलो मिटर परिघीय अंतरात फक्त एकाच कंत्राटदारकडे हा प्लांट आहे. तसेच निविदेमध्ये उच्च क्षमतेच्या प्लांट मधून निघालेले मटेरियल साईटवर व्यवस्थापना करिता उच्च क्षमतेची यंत्र सामुग्री अनिवार्य केलेली नाही. कारण ही यंत्र सामुग्री कामाचे स्वरूप धान्यात घेता वापरणे अडचणीचे आहे. या बाबतचा लेखी खुलासा दिनांक १५ जानेवारी रोजी मागविण्यात आला होता. 

    या विषयी दिनांक १६ जानेवारीच्या पत्रामध्ये कुठलाही उल्लेख नाही. परंतु सदरचे पत्र संदर्भातील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी जाणीव पूर्वक संबधित कंत्राटदाराला लाभ देण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बगल दिली आहे. या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता ह्या क्षमतेचा आर.एम सी.प्लांट मागविणे बंधनकारक नसल्याचे समजते तसेच शेड्युल बी मधील समाविष्ट बाबींमध्ये प्रत्यक्ष साईटवर गीट्टी,रेती,सिमेंट आणुन काँक्रिट करणे अंतर्भूत आहे.

असे असताना देखील जाचक अटी व शर्थि लावून सर्व कंत्राटदारांना वंचित ठेवून शासकीय नियम व अटींचे उलंघन करून साडे सहा कोटी रुपयांच्या निविदा प्रकाशित करून संगनमत करण्यास सुलभ होईल अश्या पद्धतीने षडयंत्र रचले आहे. हा अनागोंदी व मनमर्जीचा प्रकार दिलीप भोयर यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या नंतरही मुख्याधिकारी व संबंधित अभियंता दुर्लक्ष करीत आहे. या विषयी सुधारणा न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा वंचितचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.