Ticker

6/recent/ticker-posts

अवैध्य दारू विक्री बंद करा - वंचितच्या महिला धडकल्या पोलिस ठाण्यात


 

News today

प्रतिनिधी

वणी :- शहरातील वार्डा क्रमांक १७ मध्ये मागील अनेक दिवसापासुन त्याच वार्डातील रहिवासी असलेले नामे अमित शैलेश मोडक नामक व्यक्ती हे अवैध्य दारू विकीचा व्यवसाय करीत असल्याने वार्डातील लहान सहान अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. तसचे दारू पिण्यासाठी येणा-या नागरीकांची वर्दळ वाढली आहे. तरी सदरचे अवैध्य दारू विक्री बंद करण्यासाठी वंचित महिला आघाडीच्या तालुका महासचिव प्रणिता ठमके यांच्या नेतृत्वात पोलिस स्टेशन वणी येथे असंख्य महिलांनी धडक देवून मागणी केली आहे.

सदर वार्डातील अवैध्य दारू विकेत्यांकडुन दिवस रात्र दारू विकल्या जात असल्याने अनेक व्यक्ती दारूपिण्याच्या बहाण्याने येवुन या भागातील महिलांकडे अश्लिल नजरेने बघत असतात व रस्त्याने जात्ता येणा अश्लिल भाषेचा वापर करीत असतात तसेच दारू पिवुन येणा-या नागरीकांकडुन महिलांवर अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. यामुळे वार्डातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्या जात आहे. तरी तात्काळ हि अवैध्य दारू विकी बंद करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन एपीआय पेंडकर यांना देण्यात आले आहे. यावेळी वंचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम, जिल्हाउपाध्यक्षा अर्चना कांबळे, शहराध्यक्षा अर्चना नगराळे, वॉर्ड अध्यक्षा प्रिया काटकर, जिल्हा संघटिका नंदिनी ठमके, प्रतिमा मडावी, लता पाटील, विमल तामगाडगे, सविता तांबे, सुषमा मोडक, कल्पना काळे, शिल्पा काळे,  तारा मोडक, नलिनी मोडक, कमल मोडक, ज्योती मोडक, स्वाती मोडक, अंजना मोडक, संगीता मोडक, सुनंदा मोडक, स्वप्ना मोडक, अनिता गट्टेवार , वैशाली टिपले, पुष्पा बावणे, अजिदा शेख, सुषमा बावणे, यांचेसह  यावेळी वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, महासचिव मिलिंद पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन, युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कांबळे, वृषभ शेख, निरज मोडक, राजू गजरे, विलास तेलतुंबडे, आदी मान्यवर उपस्थित होते.