Ticker

6/recent/ticker-posts

चक दे खेलो नागपूर खेलो" विदर्भ स्तरीय स्पर्धेत पोलिस अधिकारी , पोलीस अंमलदार यांच्या पत्नीने नेत्रदीपक कामगिरी करून पटकावले गोल्ड मेडल.

 

 प्रतिनिधी

News today

वणी :- दि.17/ 1/2024 रोजी खासदार नितीन गडकरी क्रिडामहोत्सव" चक दे खेलो नागपूर खेलो "विदर्भ स्तरीय क्रिडास्पर्धेत माँस्टर अथल्याँटिक स्पोर्ट अँड वेलफेअर ,यवतमाळच्या खेळाडूंनी मिळविले 49 मेडल सदर स्पर्धेत यवतमाळ येथील एकूण 27 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा मानकापूर स्टेडियम नागपूर येथे पार पडल्या असून सदर स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक पांडूतात्या कवरासे, यांनी उतक्रुष्ट खेळाचे प्रदर्शन करून लांब उडी क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल, 100मि.धावणे मधे सिल्हर मेडल, तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड, यांनी भालाफेक, गोळा फेक , हँमर र्थो मधे गोल्ड मेडल, थाळी फेक मधे सिलव्हर मेडल प्राप्त केले. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या पत्नी पलवी केदारे यांनी 5 कि.मि.चालणे स्पर्धेत गोल्ड मेडल, 100 मि. धावणे स्पर्धेत सिलव्हर मेडल, वंदना कवरासे यांनी भाला फेक मधे कास्य पदक , कल्पना शेखदार यांनी 5 कि.मि.चालणे गोल्ड मेडल, थाळी फेक सिलव्हर मेडल. 100 मि.धावणे सिलव्हर मेडल, प्राप्त केले. 


मा.नितीन गडकरी खासदार चषक चक दे खेलो नागपूर खेलो" विदर्भ स्तरीय क्रिडामहोत्सवात वरील सर्व खेळाडूंनी वरील प्रमाणे क्रिडाप्रकारात कौशल्य दाखवून उतक्रुष्ट खेळाचे प्रदर्शन करून मिळविले मेडल, सदर स्पर्धेत उतक्रुष्ट कामगिरी केल्याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष गूलाब भोळे, सचिव नरेंद्र भांडारकर , देवेंद्र चांदेकर, देवानंद तांडेकर, शिलाताई पेडणेकर, प्रा.शितल दरेकर, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अति.पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पुजजलवार , पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, राहूल शेजव, गोपाल उताणे, प्रेमसींग चव्हाण, भारती ठाकरे, सर्व पोलीस अंमलदार यवतमाळ जिल्हा यांनी प्रशंसा करून सर्वाचे  अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कौतुक होत आहे.