Ticker

6/recent/ticker-posts

मुकुटबन येथे वंचित बहुजन आघाडीचा भव्य मेळावा संपन्न

Wani Today 

प्रतिनिधी

वणी :-  मुकुटबन, तालुका झरी जामनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या भव्य मेळावा आज तारीख २२ रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात संपन्न झाला. 


   परिसरातील शेकडो स्त्री-पुरुषांनी कार्यक्रमात हजेरी लावली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे होते, प्रमुख उपस्थिती जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, जिल्हा महासचिव मिलींद पाटील, महिला आघाडीच्या पुष्पाताई शिरसाट, संतोष राऊत जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग,, भारतीय बौद्ध महासभेचे भगवानराव इंगळे, शिलताई जणपदकर, निलेश मेश्राम, तालुकाध्यक्ष कैलास धोटे, सुधाकर नरांजे,भारिप बहुजन महासंघाचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रत्येकाने आपल्या पाच नातेवाईक,पाच मित्र व पाच शेजा-याना वंचित बहुजन आघाडी समजावून सांगावी, त्या पाच नातेवाईकांनी आपापल्या पाच पाच मित्र, शेजारी व  नातेवाईकांना वंचित बहुजन आघाडी समजून सांगावी, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील समाज एकत्रित होईल असे आवाहन डॉ. निरज वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून  केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठलराव जीवने, वाळके गुरुजी गौतम मून, सुधाकरराव, नवनाथ देवतळे प्रियल पथाडे, हेमराज नगराळे यांनी परिश्रम केल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.