Ticker

6/recent/ticker-posts

आप यवतमाळ शहराध्यक्ष गुणवंतराव इंदूरकर यांच्या नेतृत्वात बाजोरिया नगरला आपची प्रभाग कार्यकारिणी शाखा उदघाटन

 

News Today

प्रतिनिधी 

वणी :- ता. २६ रोजी प्रजासत्ताक वर्धापन दिनी ध्वजारोहण करून - देशासाठी बलिदान देणारे सर्व वीर स्वातंत्र्य सेनिक - शहीद भगत सिंह - देशाला विचाराची आधारशिला देणारे देशातील सर्व महापुरुष - महात्मा फुलेंना व भारत देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान देणारे महापुरुष भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरजीला अभिवादन करून आप तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले. विदर्भ होउसिंग सोसायटी बाजोरिया नगर येथे शहर अध्यक्ष गुणवंतराव इंदूरकरजी यांच्या नेतृत्वात आपचे विदर्भ नेते भाई अमन व जिल्हाध्यक्ष वसंतरावजी ढोके यांचे हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे फलकला मल्यार्पण करण्यात आले व प्रभाग शाखेचा उदघाटन करण्यात आले. भविष्यात महाराष्ट्रात यवतमाळ शहराला साफ सुंदर बनवण्या करीता स्वच्छता मध्ये no.1 बनवण्या करीता व यवतमाळ शहरातील जनतेला स्वच्छ पानी - नगर परिषद शाळांन मध्ये उत्तम शिक्षण - नगर परिषद दवाखान्यात उत्तम आरोग्य सेवा - शहराला गंदगी मुक्त करण्या करीता व प्रत्येक वार्ड मध्ये पूर्णपणे नाल्यांची काँनेक्टिव्हिटी - शहरात स्ट्रीट लाईट ची संख्या वाढवणे व शहरातील जनतेला प्ले ग्राउंड व सामाजिक सांस्कृतिक भवन अशे नगर परिषदेच्या हद्दीतील अनेक सोय सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी आप यवतमाळ शहरातील येणारे नगर परिषद निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार आहेत व त्याकरीता संघटन मजबुतीचा काम शहर अध्यक्ष गुणवंत इंदूरकर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहेत. बाजोरिया नगरला प्रभाग शाखा उभारण्या करीता नियोजन व पुढाकार जिल्हा संघटक आकाश चमेडिया - जिल्हा युवा अध्यक्ष शुभम मेश्राम -शहर कामगार आघाडी अध्यक्ष राजानंद नगराळे,- प्रभाग शाखा अध्यक्ष दिलीप सिंह ठाकूर व अल्का ठाकूर यांनी केले. सध्या यवतमाळ शहराची दुर्देवी परस्थिती बघता हे स्पष्ट होते की शहरातील जनता स्थापित पक्षाला त्रस्त झालेली आहेत संपूर्ण यवतमाळ शहराचे रस्त्यांवर गड्डे आहेत व पावसाळ्यात सर्व कळे पानी जमलेला असते वार्डात जोड नाल्या नसल्याने सांड पानी प्रभागात जमलेला असतो व त्यामुळे डेंगू मलेरिया सारखे अनेक गंभीर आजाराला परिसरातील जनतेला तोंड द्यावा लागतो.  मोठया प्रमाणात जनते कडून कर आकारणी केली जाते परंतु कुठेच घन कचरा व्यवस्थापनचा कार्य होताना दिसून पडत नाही मोकाट प्राण्यांचे बंदोबस्त असो किंवा स्वच्छता पर्यावरण वृक्षारोपणचा कार्य असो अशे कोतुकास्पद कोणताच कार्य यवतमाळ शहरात दिसून पडत नाही. संपूर्ण शहराची ही दुर्दैवी परस्थिती बघता येणारे निवडूकीत यवतमाळातील जनता नगर परिषदला एक संधी आपला देण्याकरीता आपच्या हाती सत्ता देण्याची आशा या वेळी शहराध्यक्ष गुणवंत इंदूरकर तर्फे व्यक्त केल्याची माहिती जिल्हा संघटक आकाश चमेडीया यांनी दिली.या वेळी विदर्भ नेते भाई अमन, जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी ढोके, शहर अध्यक्ष गुणवंतराव इंदूरकर, तालुका अध्यक्ष मोबीन शेख, जिल्हा युवा अध्यक्ष शुभम मेश्राम, कविश्वर पेंदोर,धनपाल नाईक, विलास वाडे, ऍड मनीष माहुलकर,आकाश चमेडीया, शुभम चांदेकर, गणेश नाईक अविनाश धनेवार, प्रशांत देवकते, राजेश धामणकर, विपुल मरहस्कोल्हे, सचिन शेळके,गोपाल गावंडे, निरंजन मेश्राम, शत्रुघ्न आडे, राजानंद नगराळे, दिलीप ठाकूर,, अलका ठाकूर, गीता मेश्राम, नामदेव इंगळे, ऋषी नथवानी, नागेश्वर भुते,प्रकाश डब्बावार, रवी भोंगाडे, गजानन आडे, डाँ नितीन राठोड, योगेश बास्टेवार इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी अनेक संख्येत उपस्थित होते