Ticker

6/recent/ticker-posts

वणीतील शिवपुराण कथेतील मंगळसूत्र चोरनारी टोळी - युपी बिहारी

 

कथावाचक प्रदीप मिश्रा हेच सांगत आहे चोरी गेलेल्या वस्तू परत करण्याचे उपाय

News Today 

प्रतिनिधी 

वणी :- येथील यवतमाळ मार्गावरील परसोडा शिवारात मागील ३ दिवसापासून काशी शिवपुराण कथा वाचण्याचा कार्यक्रम सुरू असून या ठिकाणी महिलांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दररोज चोरी जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यात उत्तरप्रदेश व बिहारतील मंगळसूत्र चोरणारी टोळी सक्रिय असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे असलेतरी चक्क कथा वाचकच चोरी गेलेल्या वास्तू परत मिळायचे अप्रमाणित उपाय सांगत असल्याने चर्चेला ऊत आला आहे. 

भक्ती आणि श्रद्धा आली की मग सर्व सामान्य माणसांच्या भावनिक बाब निर्माण होतो. या भावनिक बाबीत कितीही नुकसान झाले तरी ते सोसून घेण्याची मानसिक तयारी देखील केल्या जाते कारण चोरी गेलेली वस्तू परत मिळणार नाही हे त्यांना माहीत असते. तरी देखील मानसिक समाधान मिळण्यासाठी पोलिस स्टेशनला काही जागरूक नागरिक तक्रारी करीत असतात. असाच प्रकार वणी येथील शिवपुराण कथावाचन कार्यक्रमात घडत आहे. 

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातून महिला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आहे. यातील प्रत्येक विवाहित महीलेल्या गळ्यात तिच्या सौभाग्याचं लेन म्हणून सोन्याचं मंगळसूत्र असतातच तर काही महिलांच्या गळ्यात मंगळसूत्रसह इतरही सोन्याचे किमती दागिने असतातच खेड्यापाड्यातील महिला अत्यंत भावनिक , श्रद्धाळू आणि सध्या भोळ्या असतात व ज्या खेड्यातून त्या येतात त्यात त्या आपला समूह करूनच राहतात याच बाबीचा व गर्दीचा फायदा घेवून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळ्या आपले सावज शोधतात व त्यांच्या गळ्यातील किमती सोन्याचे मंगलस्सुत्रावर आपला हात साफ करून घेत आहे. या टोळीत उत्तर प्रदेश व बिहार मधील तरबेज महिला व पुरुष असल्याचे माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.यासाठी पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. 

चोरी गेलेल्या वस्तू ,धन परत मिळण्यासाठी कथवाचक देतो हास्यास्पद सल्ले

चोरी गेलेल्या  हरवलेल्या वस्तू परत मिळण्यासाठी चक्क कथवाचक प्रदीप मिश्रा हे एका व्हिडिओ मध्ये असे सांगत आहे की चोरी गेलेल्या वस्तू, धन परत मिळण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष एका वाटीत मध घेवून घराच्या मध्यभागी ठेवल्यास ते धन पाच ते सात दिवसांनी परत मिळतील असा हास्यास्पद सल्ल्याने लोकांमध्ये उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे.  याबाबत कोणाच्या धार्मिक भावना दुखण्याचे काही कारण नाही तर्क बुद्धीने विचार करने गरजेचे झाले आहे.