Ticker

6/recent/ticker-posts

वन विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे वाघाच्या बछडाचा दुर्दैवी मृत्यू..

 


News Today

दिलीप भोयर
वणी :- येथून जवळच असलेल्या सुकणेगाव शिवारात दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी  २ वाजताचे दरम्यान वाघाच्या पिल्ल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेपूर्वी दिनांक  ३० रोजी वणी वनपरिक्षेत्राचे अधिकारी तथा कर्मचारी यांना सदर परिसरात एक वाघीण व तिचे दोन छोटे पिल्ले सुकनेगाव शिवारात फिरत आहे अशी माहिती गावकऱ्यांनी देऊन वन विभागास सतर्क केले असता वान विभागाने मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोप गावकरी करीत आहे. 

सुकनेगाव शिवारातील जंगली भागात   दि.  ३१  ला वाघिणीच्या दोन पिल्लापैकी एक पिल्लू अशक्त अवस्थेत एकटेच विवळत बसून आहे अशी माहिती सकाळी साडेदहा ते अकरा वाजते च्या दरम्यान संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यास घटनास्थळाचा पत्ता देऊन त्वरित येणे बाबत सूचना दिली .परंतु वणी रेंज मधील कर्मचारी अधिकारी यांनी सदरबाब गांभीर्याने न घेता घटनास्थळावर त्वरित न येता फार विलंबाने वाघिणीचे पिल्लू मेल्यानंतर आले. वास्तविक पाहता घटनास्थळी वाघाचे छोटे पिल्लू एक वर्षाचे आत चे एकटेच अशक्त  अवस्थेत असल्याची विस्तृत माहिती मिळाल्यानंतर वेळ न गमवता व वनविभागाची पूर्ण टीम व तसेच डॉक्टर घेऊन येण्याची आवश्यकता नसताना सुद्धा ही सर्व टीम विलंबाने घटनास्थळी दाखल झाली. ते फार उशिरा आल्याने सदर वाघिणीचे पिल्लू जागेवरच गतप्राण झाले .जर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ न गमवता घटनास्थळी पोहोचले असते तर त्या निष्पाप वन्यजीवाचे प्राण वाचले असते. यास सर्वस्वी संबंधित अधिकारी वन कर्मचारी जबाबदार आहेत. जर हे क्षेत्रिय कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयी राहत असते तर कदाचित त्या छोट्या पिल्लाचे प्राण वाचले असते. यावर सुद्धा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात हे अत्यंत गंभीर बाब आहे. वाघ या प्राण्याच्या संवर्धना करता शासन करोडो रुपये खर्च करते परंतु वनविभागाच्या वन्यजीवासंबंधी उदासीन कारभारामुळे वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन होत नाही ही फार गंभीर बाब आहे .यावर वनविभागाचे वनमंत्री निश्चितच कारवाई करेल अशी वन्यप्रेमींची अपेक्षा आहे. यावेळी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोंडवले यांचे सोबत दूरध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होवू शकला नाही.


बघा व्हिडिओ