चंपत पाचभाई यांना माणिक रत्न पुरस्कार
२१ जानेवारी रोजी यवतमाळ येथे होणार सन्मान
News Today
प्रतिनिधी
वणी :- तालुक्यातील निंबाळा येथील सामाजिक कार्यकर्ते चंपत पाचाभाई यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत माणिकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आल्या असून येत्या २१ जानेवारी रोजी यवतमाळ येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची विचारधारा आणि मानवतावादी विचारांची जबाबदारी स्विकारुण कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या विचारांची माणसे एकत्र येऊन “तुकड्याची झोपडी ” ही स्मरणिका संदर्भ साहित्य लेखन पुर्ण केले असून अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान व्हावा म्हणून “ग्राम स्वराज्य महामंच ” सातत्याने पाठपुरावा करीत आहे. परिणामी शाबासकीची थाप देण्यासाठी अशा कर्तृत्ववान व्यक्तींना “माणिक रत्न पुरस्कार ” देवून सन्मानित करण्यात येणार आहे म्हणुन सदर स्मरणिका प्रकाशन सोहळा यावर्षी यवतमाळ मध्येच होणार असल्याचे ग्राम स्वराज्य महामंचच्या वतीने कळविण्यात आले आहे.
“तुकड्याची झोपडी स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट लेखन केले आहे असून यात साहेबराव दामोधरे (दर्यापूर), सुनील साबळे (शेंडगाव),चैताली भस्मे,सर्पमित्र (नागपूर),राजेंद्र सतई (नागपूर),वैभव ठाकरे (चंद्रपूर),कुसुम अलाम (गडचिरोली),नारायण मरस्कोले (यवतमाळ),चंपत पाचभाई (वणी),बाळु धुमाळ (राळेगाव),निरंजन गोंधळेकर पेंटर (यवतमाळ) यांना “माणिक रत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.तर विशेष पुरस्काराकरिता पंजाब चव्हाण याडीकार (पुसद),अरुणा लोनकर (पिंपरी दुर्ग),मोझरकर महाराज (यवतमाळ) यांचा समावेश आहे.अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या माध्यमातून ही “तुकड्याची झोपडी” स्मरणिका (तिसरी आवृत्ती) प्रकाशित करण्यासाठी कार्यकारी संचालक मंडळ मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, प्रा.मोहन वडतकर,गिरीधर ससनकर,आशाताई काळे, रेखाताई निमजे,कृष्णा भोंगाडे आणि सर्व सहकारी सदस्य संचालक यांच्या पुढाकाराने यवतमाळ येथे लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत ग्राम स्वराज्य महामंचच्या वतीने कळविण्यात आले आहे.