Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्ती निमित्त शाळेला वॉटर फिल्टर मशीन भेट.

 

             चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार शुद्ध पाणी.

News Today

प्रतिनिधी 

वणी: सेवानिवृत्ती निमित्त राष्ट्रीय प्राथमिक शाळा राजूर येथील वर्ग 1 ते 4 च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विद्यालय ,राजूर कॉ येथील 40 वर्ष नाईक पदासाठी सेवा देणारे रामदास वारलुजी काकडे यांच्या तर्फे शुद्ध पाण्याचे वॉटर फिल्टर मशीन भेट देण्यात आली.

    नौकरी ही आपल्या उपजीविकेचे साधन असते.ज्या नौकरीच्या आधाराने आपल्या संसाराची गाडा उत्तम रीतीने चालवू शकतो. त्या नोकरीच्या सेवानिवृत्तीला भव्य वॉटर फिल्टर मशीन भेट दिली.

  रामदास काकडे यांच्या या कर्तृत्वाचे राजूर पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक गण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


   सर्व सोयी सुविधा युक्त राष्ट्रीय प्राथमिक शाळेच्या भौतिक सुविधेत आणखी वॉटर फिल्टर मशीन ची भर पडली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याला थंड व शुद्ध पाण्याची गरज असते,या सुविधेमुळे ही गरज पूर्ण झाली आहे.

   या प्रसंगी राष्ट्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लिपटे सर,राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.धानोरकर सर  ,सत्कार मूर्ती रामदासजी काकडे ज्येष्ठ शिक्षिका जुमनाके मॅडम, तुराणकर बाबू, मोहितकर सर,कु.आवारी मॅडम, पुरके सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मिलमिले सर यांनी केले.

   या सत्कार कार्यक्रमात राष्ट्रीय प्राथमिक शाळा तसेच राष्ट्रीय विद्यालय राजूर चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.