Ticker

6/recent/ticker-posts

मॅकरुन स्टूडन्स अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुलची शहरातील शाखा "अवैध"

 

•शाळेच्या सभोवताल बियरबार व हॉटेल्स.

•शिक्षण विभागाला कारवाईसाठी मुहूर्त गवसेना

News Today 

दिलीप भोयर 

वणी :- येथील इंग्रजी माध्यमाची असलेली मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी स्कुलची शहरातील शाखा ही अवैध्य पद्धतीने चालवल्या जात असून नुकतीच नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. या शाळेच्या सभोवताल मध्य विक्रीची दुकाने व मांसाहारी हॉटेल्स असताना देखील अश्या बेकायदेशीर पद्धतीने चालत असलेल्या शाळेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असले तरी कारवाईसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त बघावा लागत असल्याने पालकांमध्ये रोष निर्माण होत आहे. याठिकाणी शाळा चालविण्याचा कोणताच परवाना शाळेकडे नाही.मागील अनेक वर्षापासून वरोरा मार्गावरील उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या मागे खासगी आलेल्या तीनपत्र्याच्या शेड मध्ये सीबीएससी माध्यमांची वर्ग एक ते चार पर्यंतची शाळा भरल्या जात आहे. सीबीएससी नियम व धोरणा नुसार ही शाळा मजबूत बांधकाम केल्या गेलेल्या इमारतीत सुरू व्हायला पाहिजे. तसेच मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड देखील पाहिजे.


 तसेच शाळेच्या १०० मिटर अंतरावर कोणतेही मद्य विक्रीची दुकाने नसावे असा प्राथमिक नियम असताना देखील सभोवताल मध्य विक्री व मांसाहारी हॉटेल्स आहे. तरी देखील विद्यार्थ्याना अश्या वातावरणात शिक्षण देण्याचे बेकायदेशीर धोरण शाळा व्यवस्थापकाकडून राबविल्या जात आहे. अश्या वादग्रस्त व मान्यता प्राप्त नसताना देखील उद्याच्या भविष्याला बेकायदेशीर पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवत असले तरी शिक्षण विभाग मात्र  चक्क डोळे झाक का? करीत आहे.असा प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळेवर कारवाई करण्यासाठी मुहूर्ताची तर वाट बघत नाही. असा प्रश्न निर्माण झाला आहे.