Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडी कडून प्रतीकात्मक ई.व्ही.एम.मशीनची होळी

 

कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी 

News Today

प्रतिनिधी

यवतमाळ :- संपूर्ण देशात ईव्हीएम ने निवडणुका विरोधात तीव्र जनमत असून सुद्धा केंद्र सरकार आणी निडणूक आयोग ऐकायला तयार नाही, जगातील अनेक प्रगत राष्ट्र बॅलेट पेपर वर निवडणुका घेतात. पण सरकार हेकोखोर पणे वागत आहे. त्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात, शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ येथे संविधान चौकात, काल तारीख २४ रोजी दुपारी 1 वाजता प्रतिकात्मक ईव्हीएमची होळी करून  तीव्र निषेध व्यक्त केला येत्या सर्व निवडणुका कागदी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. 


ईव्हीएम मशीन ही इलेक्ट्रिक यंत्र असून यातून मतांची हेराफेरी करून निकाल बोलवता येतो हे सुप्रीम कोर्टातने देखील मान्य केले आहे. त्यामुळे भारतातील लोकशाही आणी संविधानिक, मानवीमूल्य टिकविण्याची सरकारची जबाबदारी असून, सुद्धा सरकार या पासून पूर्णतः पळ काढत आहे. त्यामुळे समस्त सामान्य जनतेने ईव्हीएम विरोधी आंदोलनात सर्व शक्तीनीशी उतरण्याचे आवाहन केले, यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.निरजभाऊ वाघमारे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी,महिला महासचिव पुष्पा सिरसाट,सरला चचाने,जी.उपाध्यक्ष विशाल पोले, कोषाध्यक्ष अरुण कपिले,तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर,शहराध्यक्ष कुंदन नगराळे, महिला उपाध्यक्ष संध्या काळे, वंदना उरकुडे, सचिव भारती सावते,मीनाताई रणीत,शिला वैद्य शहराध्यक्ष करुणा चौधरी,सुकेशिनी खोब्रागडे, सोसिअल मीडिया प्रमुख खंडेश्वर कांबळे,उत्तमराव कांबळे, आनंद भगत,संतोष राऊत, प्रमोद पाटील,सुभाषजी सावते, शैलेश भानवे विलास वाघमारे,गुणवंत मानकर नामदेव इंगोले उमेश दातार, उमेश राजू, निशा निमकर, सुधाकर वासनिक, निलेश स्थूल, सरिता भोवते इंदू सांगडे, प्रमिला भगत, रत्ना खोब्रागडे शारदा दंदे,दुर्गा गुजर, इत्यादी कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.