Ticker

6/recent/ticker-posts

तरोडा येथे तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचे पुतळ्याचे अनावरण

 

व्यसनात बुडालेला समाज अधोगतीला कारणीभूत ठरतो - सेवकरामजी महाराज यांचे प्रतिपादन

News Today

प्रतिनिधी

वणी :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या दोन संतांनी समाजातील सामजिक बदल घडविण्यासाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवले आहे. रुड्या परंपरा, दारूबंदी, हुंडाबळी, व्यसनमुक्ती यापासून समाजाने दूर राहावे असे मौलिक संदेश देत आपल्यातील अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु समाजातील अज्ञानामुळे दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. किशोरावयीन मुल व तरुणाई व्यसनाच्या दलदलीत फसले आहे. ही ग्रामीण समाजासाठी प्रचंड गंभीर बाब आहे. 



उद्याच भविष्यच जर असे व्यसनात बुडालेल असेल तर समाजाच्या अधोगतीला आपणच जबाबदार असणार आहोत.त्यासाठी आपली जबाबदारी म्हणून गावातील नागरिकांना व तरुण मुलामुलींना व्यसनमुक्त व्हावं लागेल तरच येणारा काळ हा आमच्या प्रगतीचा असेल अन्यथा आमचे पतन झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन पंढरपूर येथील ग्रामगीता आश्रमाचे संचालक सेवकरामजी महाराज यांनी तरोडा येथील आयोजित वंदनीय तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण व संत गाडगे महाराज यांच्या जयंती सोहळ्या निमित्त बोलत होते. 



यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते संजय खाडे व आमदार बोदकुरवर यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी विजय पिदुरकर,   पुरुषोत्तम आवरी आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी अथक मोलाचे सहकार्य मोहन वैद्य , मोरेश्वर जेऊरकर, श्यामसुंदर भोयर, संतोष गोवरदीपे, ताराचंद नागतुरे, रमेश क्षीरसागर,  राहुल भोयर, राहुल जेऊर कर, भास्कर डोंगे, सौरभ भोयर, संदेश तीतरे, दीपक रासेकर, महेश जेऊर कर, श्रीमती मंदाताई भोयर, पूजा भोयर,मंजु हरदे,harde हे लिहा, रुपाली वैद्य, सीमा गोवरदिपे, कल्पना क्षीरसागर, वंदना पाऊंकर यांनी परिश्रम घेतले.  तसेच मोहन वैद्य यांनी ज्याच्या घरी तुकडोजी महाराजांचे फोटो नवते अशा तरोडा गावातील १७ महिलांना मोहन वैद्य कडून तुकडोजी महाराज ची प्रतिमा भेट दिली.