Ticker

6/recent/ticker-posts

वणी शहरातील काँक्रिट रस्त्याच्या निविदा घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

 

वंचितचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांची पोलिस अधीक्षकाकडे तक्रार

कागदपत्रांची पूर्तता निविदेसाठी करून प्रत्यक्ष मोक्यवर वेगळा कंत्राटदार

सा.बां. विभागाची फसवणूक, अधिकाऱ्यांची डोळेझाक

वणी :- शहरातील मुख्य मार्गावरील चालू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या निविदेत मोठा घोळ करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत करोडो रुपयचे काम नियम व अटींना धाब्यावर बसवून केल्या जात असल्याची माहिती पुराव्यानिशी पोलिसांना देवून वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर यांनी दोषींवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली आहे. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने दिलीप भोयर यांनी संबंधितांवर कारवाई करिता पोलिस अधीक्षक यवतमाळ यांचेकडे तक्रार केली असल्याची माहिती काल ता. २७ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. 


शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रेल्वे गेट रा. मा. ३१५  मध्ये सिमेंट चौपदरी रस्ता, नाली बांधकाम व पथ दिवे बसविणे ह्या कामाची ब -२ निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाकडून मिळविण्यासाठी मे. जे. पी. एंटरप्राईजेस मुबई यांनी निविदेतिल बंधनकारक असलेल्या अटी व शर्ती नुसार प्रत्यक्ष कामाच्या मोक्याच्या २५ किलो मिटर परिघीय अंतरात स्वामालकीचा ६० घनममीटर प्रती तास क्षमतेच्या आर.एम. सी. प्लांट सह चीलींग प्लांट, सॅन्ड वॉश प्लांट, ट्राजिट मिक्सर, पेव्हर, इत्यादी स्वमालकीची असल्याबाबतचा पुरावा कागदोपत्री सादर करून निविदा मिळवली परंतु निवीदेमध्ये ही स्वामालकीची यंत्र सामुग्री वापरून प्रत्यक्ष कामावर नमूद केलेल्या अंतरावरून स्वमालकीच्याच प्लांट वरून सिमेंट काँक्रिट आणून स्वतःच्या पदरी नेमणूक केलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांव्दारा  काम करणे कंत्राटदाराला बंधनकारक असताना जे.पी. एंटरप्राईजेस यांनी नियम व अटींचा भंग करून स्वतःचा प्लांट न उभारता ट्रायल अँड रनचा अहवाल सादर न करता कामास सुरवात कुठल्या आधारावर केली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांनी कुठल्या आधारावर संबंधित कंत्राटदाराला आर. व्ही. उंबरकर कंट्रशण कंपनी वणी यांना काम करण्याची मुभा दिली हा आश्चर्याचा विषय असून निकृष्ट दर्जाच्या कामाची निर्मिती होत आहे. चालू कामामध्ये संजय ऑटो मोबाईल जवळ रस्त्याचा पृष्ठ भाग उखडून खड्डे पडले आहे. तसेच साई दरबार जवळील लेनच्या पूर्ण लांबीमध्ये रस्त्याला जागोजागी तडा गेलेल्या आहेत. काम मागील दोन वर्षापासून अत्यंत संथ गतीने मनमानी करून सुरू असून ह्यावर बांधकाम विभागाचा कुठलाही अंकुश दिसून येत नाही.  तसेच कामावर सरकारी अभियंते कधीच निदर्शनास येत नाहीत ह्या सर्व प्रकारामुळे जनतेची असुविधा निर्माण होऊन वारंवार किरकोळ अपघात होत असतात. 


     म्हणून ह्या विषयी वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी वारंवार तक्रारी करून खात्यास माहिती दिली शेवटी माहितीच्या अधिकारांतर्गत कागदपत्र मिळाल्यावरून हा घोटाळा निदर्शनास आला आहे. तसेच कार्यकारी अभियंता यांनी कामाचा दर्जा खारब असताना सुद्धा ह्या कामाचे ८ चालू देयके संबधित कंत्राटदारास अदा केली आहे. ज्या अर्थी २५ किमी परिघीय अंतराचे आत प्लांट उभारून एक महिन्याचे आत ट्रायल अँड रन अहवाल सादर झालेला नसताना करार नामा रद्द का केला नाही. व डोळेझाक करून, संगनमत करून, शासनाची फसवणूक केली आहे. असे प्राप्त माहितीच्या आधारावरच ठाणेदार पोलिस स्टेशन वणी यांचेकडे रीतसर गुन्हे नोंदवून उचित कारवाई करीता लेखी तक्रार दिनांक १५/२/२०२४ रोजी दाखल केली आहे. परंतु पोलिस प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे दिनांक २१/२/२०२४ रोजी पोलिस अधीक्षक यांचेकडे उचित कारवाई व चौकशी करीता तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक्षक यवतमाळ यांचे कार्यालयाकडून काय कारवाई केल्या जाते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आयोजित पत्रकार परिषदेला वंचितचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, तालुकाउपाध्यक्ष  नरेंद लोणारे , महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम, महासचिव प्रणिता काळे, युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कांबळे, सोनू दुर्गे, वशिम शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

 स्थानिक विराजमान लोकप्रतिनिधींची चुप्पी का ? 

चालू असलेल्या कोट्यावधी रुपयाचे काम प्रत्यक्ष चुकीच्या कंत्राटदाराने केल्यामुळे रस्ता क्षतिग्रस्त झाला असताना सुद्धा शहरातील मुख्य मार्गाच्या कामावरून पदावर विराजमान स्थानिक लोक प्रतिनिधीची रात्रदिवस येजा असताना त्यांचेकडून दुर्लक्ष का केल्या जात आहे. कदाचित यासाठी त्यांचीच मूकसंमती तर नाही ना अशी शंका निर्माण होऊन जनतेमध्ये चर्चेला ऊत आला आहे.