Ticker

6/recent/ticker-posts

वणी शहरात महिलांसाठी स्वच्छता गृहाची वानवा, महिलांच्या कुंचंबना थांबवा - वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक


जिल्हाध्यक्षा धम्मावती वासनिक यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांनी नगर परिषदेत दिली धडक

News Today

प्रतिनिधी

वणी :- नगर परिषद हद्दीतील कुठेच सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था नसल्याने महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे. या विषयी वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक झाली असून शहरात महिलांच्या स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यात यावी या मागणीला घेवून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  धम्मवातीताई वासनिक यांनी असंख्य महिलांना घेवून नगर परिषदेला काल ता. २७ रोजी दुपारी १ वाजता धडक दिली यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.

सरकार मोठ्या दिमाकदारिने स्वच्छता अभियान राबवित असते. परंतु प्रत्यक्षात मात्र कुठेच स्वच्छता गृह स्वच्छ बघायला मिळत नाही त्यातल्या त्यात महिलांसाठी तर कुठच स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था दिसून येत नाही वणी शहरात देखील महिलांच्या स्वच्छता गृहाची कोणतीच व्यवस्था नाही त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. या गंभीर विषयला वंचित बहुजन महिला आघाडीने ऐरणीवर घेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असंख्य महिला एकत्रित आल्या व त्यांनी जिल्हाध्यक्षा धम्मवाती वासनिक यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर धडक देवून लवकरात लवकर महिलांच्या स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी वांचितचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव वैशाली गायकवाड, जिल्हाउपध्यक्षा अर्चना कांबळे, तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम, महाचिव प्रणिता काळे, शहराध्यक्षा अर्चना नगराळे, नंदिनी ठमके, कीर्ती लभाने, अंजू पासवान, वैशाली गावंडे सुनीता साठे, रत्नमाला चालखुरे, अलका पाजारे, नम्रता पताडे , काजल साठे , सुजाता साठे, धम्मा गायकवाड, सुनीता कांबळे, सारिका साठे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.