Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिना निमित्त मारेगाव येथे सन्मान स्त्री शक्तीचा" जागर कर्तृत्वाचा कार्यक्रम

 ८ ते १० मार्च पर्यंत विविध विविध स्पर्धा , मैत्री कट्टा ग्रुपचे आयोजन

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार


News Today

प्रतिनिधी

मारेगाव :- महिलांच्या सामजिक उत्थानासाठी सदैव अग्रेसर असलेल्या मारेगाव मैत्री कट्टा  ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्याने ता. ८ ते १० मार्च पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात  प्रसिद्धीच्या प्रवाहात नसलेल्या परंतु सकारात्मक  कार्य करणाऱ्या कर्तुत्वान नोंदणीकृत महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे.


 यात ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपसंपादक संतोष कुंडकर वणी, प्रमुख पाहुणे गजानन खापने संचालक वसंत जिनिंग मारेगांव, सौ. इंदुताई किन्हेकर माजी नगराध्यक्ष मारेगाव,हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी सन्मान स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा या शोभायात्रेचे आयोज. ता.९ मार्चला सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे. ही शोभा यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून शहरात मार्गक्रमण करीत परत येईल.शोभायात्रेत विविध राज्याचे लोकनृत्य आणि देखावे सादर केले जाईल.या भव्य महिला सांस्कृतिक  रॅली चे उदघाटन सौ. किरणताई देरकर यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  इजहार शेख , सौ. संध्या पोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव चे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा हे उपस्थित राहतील. १० मार्चला सायंकाळी ५ वाजता वयवर्ष  ३० वरील वयोगटाच्या महिला करीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

 वसंत जिनिंगच्या पटांगण वर होणारी ही नृत्य स्पर्धा समूह नृत्य व एकल नृत्य अश्या दोन प्रकारे घेण्यात येणार आहे. या नृत्य स्पर्धा चे उदघाटन वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी पतसंस्था वणी, प्रमुख पाहुणे संजय खाडे अध्यक्ष जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को सोसायटी ली. वणी ,  रवि धानोरकर संचालक वसंत जीनिंग वणी,  शामा दीदी तोटावार वणी डॉ. मनीष मसकी नगराध्यक्ष मारेगाव डा.विनोदकुमार आदे संपादक वणी न्यूज एक्स्प्रेस वणीहे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यातील विजेत्या समूह नृत्याला प्रथम ११०००/- द्वितीय ७०००/- तृतीय ५०००/-  रोख एकल नृत्याला प्रथम ७०००/-  द्वितीय ५०००/-  तृतिय ३०००/- रोख आणि चषक देण्यात येणार आहे . प्रवेश फी समूह नृत्यासाठी ५०० तर एकल नृत्यासाठी २०० रूपये राहील. प्रवेशासाठी सौ .प्रतिभाडाखरे 9922669648, सौ.बीना दुपारे (हेपट) 9356035463 सौ.मयुरी जैस्वाल 7066006684  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन  मारेगावं मैत्री कट्टा ग्रुप च्या  वतीने कार्यक्रमाचे संयोजक दीपक जूनेजा  यांनी केले  आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उदय रायपुरे, गजानन जैस्वाल, शहाबुद्दीन अजानी, दुष्यंत  जैस्वाल आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहे.