Ticker

6/recent/ticker-posts

लालगुडा ग्राम पंचायीमध्ये EVM बंदी बाबत क्रांती कारक ठराव पारित

 

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील पंचायत समिती येणाऱ्या लालगुडा ग्राम पंचायतीने २६ जानेवारीच्या धर्तीवर संपन्न होणाऱ्या ग्रामसभेत निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वोटिंग मशिनला (EVM) निवडणुकीत बंदी घालावी या करिता एकमताने क्रांतिकारक ठराव पारित केल्याने सर्वच कौतुक केल्या जात आहे.



राज्य व केंद्र निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या इलेक्ट्रिक वोटिंग मशीनचा वापर करून घेण्यात येत आहे. परंतु या यंत्राचा कोणताही विश्वास जनतेत उरला नसल्याने सर्वत्र या यंत्राच्या विरोधात ओरड होत आहे. 



त्यामुळे लोकशाही ही वाचली पाहिजे मतदात्याला आपल्या मतदान हे योग्य झाले असा भरोसा निर्माण व्हावा या करिता वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लालगुडा ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत सदस्या शारदा मेश्राम यांनी ईव्हीएम बंदी बाबत ठरवा मांडला असता त्याला अनिल डांगे यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते एक क्रांतिकारक निर्णय पारित झाला व येत्या लोकसभा,विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्राम पंचायत निवडणुकीत इलेक्ट्रिक वोटिंग मशीनचा वापर न करता मतदानासाठी कागदी मतपत्रिकेचा वापर करावा अशा ठराव घेण्यात आला यावेळी सरपंच्या सौ. गीता उपरे व ग्रामसेवक हनुमंत गिरी यांनी स्वाक्षरी करून पुढील कारीवाही पूर्ण केली. इतरही ग्राम पंचायतीने अश्या पद्धतीने लोकशाही वाचविण्यासाठी सामोरे यावे अशी चर्चा तालुक्यात जोर पकडत आहे.