Ticker

6/recent/ticker-posts

महाशिवरात्रीच्या पर्वावर चिखलगाव येथे होणार भव्य पदावली भजन स्पर्धा


 

News Today

प्रतिनिधी

वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे 9 व 10 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळाकडून भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत शामिल होण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे. 


 तालुक्यातील चिखलगाव येथे हेमाडपंथी शैलीचे प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी ही गावातीलच श्री शंकर बाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्याकडेच असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळाकडून 9 व 10 मार्च रोजी या भव्य भजन स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. 8 मार्च रोजी या स्पर्धेचे उदघाटन चिखलगावचे उपसरपंच सुनील कातकडे यांच्याहस्ते पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 बक्षिसे ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेक शिव भक्तांकडून वैयक्तिक बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक हे 16 हजार रुपये आहे तर शेवटचे 4 हजार रुपयापर्यत एकूण 10 बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत अधिकाधिक भजन मंडळांनी आपले नाव नोंदविण्याचे आव्हान अयोजकांडून करण्यात आले आहे. ज्या भजन मंडळांना आपले नाव नोंदणी करायचे आहे त्यांनीम नोज नवले मो. क्र. 7767044102स चिन नागपुरे मो.क्र. 8805379670,व सुशील मोहूर्ले 7038741838मं डळातील सदस्य यांच्याकडे संपर्क साधावा.